
हैदराबाद : चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबाद येथे बुधवारी हा सामना खेळवला गेला. भारताचा या सामन्यात पराभव झाला असला तरी या सामन्यादरम्यान भारतीय संघाने एका महत्त्वपूर्ण विक्रमाची नोंद केली आहे.
भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) क्रिकेटमध्ये २,००० षटकार पूर्ण करुन विक्रमाची नोंद केली आहे. असा विक्रम करणारा भारतीय संघ जगातील दुसरा आणि आशियातील पहिला संघ ठरला आहे. या प्रकारातील जागतिक विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये २,००० षटकारांचा टप्पा गाठणारा भारत हा आशियातील पहिला देश बनला आहे.
वेस्ट इंडीजने वेस्ट इंडीजने तिसऱ्या टी-२० सामन्यात २,००० षटकारांचा टप्पा गाठला होता आणि असे करणारा तो जगातील पहिला संघ ठरला होता. सध्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.
भारतीय संघाने चौथ्या टी-२० सामन्यात ही कामगिरी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या एकूण षटकारांची संख्या आता २,०१० झाली आहे, तर वेस्ट इंडीजने या फॉरमॅटमध्ये एकूण २,०२६ षटकार मारले आहेत. वेस्ट इंडीज आणि भारतापाठोपाठ न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडीजने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १,५८५ षटकार मारले आहेत. पाकिस्तान १,५०७ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका १,४०७ षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.














