
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा संकल्प अभियान आम्ही राबवले. यात विशाल परब यांनी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त सेवाभाव जपण्याचं काम केलं. सामाजिक कार्याची जाणीव त्यांना असून सामाजिक बांधिलकी जपण्याच काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत आहे, याचा आनंद असल्याची भावना भाजप महाराष्ट्र सहप्रभारी खास. सदानंदशेठ तानावडे यांनी व्यक्त केली. सावंतवाडी येथे 'भव्य महाआरोग्य शिबीरा'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री. परब यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चालू असलेल्या सेवा अभियाना अंतर्गत तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन खास. सदानंद शेठ तानावडे यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप सिंधुदुर्ग व सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयुष हॉस्पिटलचे संचालक अनंत सरनाईक यांनी विशाल परब यांना कोल्हापूरी फेटा परिधान करत सन्मानित केले. तसेच महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर व पदाधिकाऱ्यांनी वृक्ष देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र भाजप सहप्रभारी खासदार सदानंदशेठ तानावडे, भाजप युवा नेते विशाल परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मिशन फॉर लोकल पेडणेचे अध्यक्ष राजन कोरगावकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, राजू बेग, शिवानी नाईक, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, रवींद्र मडगावकर, प्रभाकर सावंत, मधुकर देसाई, जितेंद्र गांवकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नीलम नाईक, सुकन्या टोपले, सह्याद्री फाउंडेशनचे सुनील राऊळ, सुनिता पेडणेकर, प्रसन्न देसाई, हितेन नाईक, विनेश तावडे, पुखराज पुरोहित, प्रशांत सुकी, प्रथमेश सावंत, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये, दुलारी रांगणेकर, विलास जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खास. श्री. तानावडे पुढे म्हणाले, घटस्थापनेपासून आरोग्य शिबीरास सुरूवात झाली असून नामवंत हॉस्पिटल या शिबिरात आणण्याचं काम विशाल परब यांनी केलं. मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. केवळ राजकारण म्हणून काम न करता नरेंद्र मोदी यांच विकसित भारत हे व्हीजन घेऊन ते कार्यरत आहेत. अंत्योदयाच तत्व जपण्याचं काम विशाल परब करत आहेत.
विकसित भारतसाठी त्यांच योगदान देखील महत्वाचे ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कोणताही समारंभ किंवा खर्चिक कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्य शिबिर’ हा अत्यंत स्तुत्य संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे असं मत त्यांनी व्यक्त केल.
भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद व ३ शहरात 'महा आरोग्य शिबीर', बंधारा बांधण्याच काम आम्ही केलं. बुके ऐवजी बंधारा, पोस्टर ऐवजी आरोग्य सेवा या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. वर्षाचे १२ ही महिने १६४ गावातील गोरगरीब जनतेसाठी सामाजिक काम करण्याच कार्य आम्ही करत आहोत. राजकारणात मी कुणाला कधी शत्रू मानलं नाही, अन् पुढेही मानणार नाही.
त्यामुळे माझ्यावर टीका केली तर उत्तर देत नाही. विरोधकांना सुबुद्धी देण्याचीच प्रार्थना करतो. तसेच हे महा आरोग्य शिबीर हे केवळ काही दिवसांसाठी नसून दर मंगळवारी जनसंपर्क कार्यालयात कायमस्वरूपी ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून या नामांकित रूग्णालयातील आरोग्य सेवा यापुढे देखील गरजूंना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले, यांनी यंदाच्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या संकल्पनेनुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मागील काही दिवसांत बांदा, मळेवाड, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि आंबोली यांसारख्या विविध भागांत मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांचा तळागाळातील हजारो रुग्णांनी लाभ घेतला.
यासह मोफत औषधोपचार, नेत्र तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचारांची व्यवस्था करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आधीपासूनच सुरू असलेल्या 'टेलिमेडिसिन' सुविधाही गरजूंना लाभदायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पुखराज पुरोहित, सह्याद्री फाउंडेशनचे सुनील राऊळ, गोव्याचे नेते राजन पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी, निलेश गुरव यांनी केलं. आभार ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी मानले.
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर हे भव्य दिव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी बेळगाव येथील सुप्रसिद्ध केएलई रुग्णालयाची ९२ जणांची टीम सहभागी होती. याव्यतिरीक्त पुणे येथील नामवंत रुबी, दिनानाथ मंगेशकर, ज्युपिटर, लोकमान्य कोल्हापूर येथील अथायू रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्फत तपासणी व मार्गदर्शन केले. तसेच डोळे तपासणी बरोबर मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आहे.
याशिवाय इएनटी स्पेशालिस्ट मार्फत तपासणी करून गरजवंतांना श्रवणयंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दिव्यांगांना काठी, वॉकर देखील उपलब्ध करून दिले जाणार असून या शिबिरात टुडी-इको, इसीजी इ. सोई देखील उपलब्ध करून देण्यात आली. मळेवाड येथे झालेल्या शिबिरात किडणी ट्रान्सप्लांटच्या दोन रुग्णांचा संपूर्ण खर्च शासकीय योजनेतून व विशाल परब यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जवळपास पाच हजार रुग्णांनी आतापर्यंत या शिबिराचा लाभ घेतला असून मोठा लाभ सर्वसामान्यांना झाला आहे.











