LIVE UPDATES

Ratnagiri NCC Sailing Expedition : रत्नागिरीतून ६० एनसीसी कॅडेट्सची २५० किमी सागरी नौकावहन मोहीम

‘कोकण ज्ञान तरंग’द्वारे शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 13:45 PM
views 26  views
Maharashtra Naval NCC cadets preparing for the Konkan Dnyan Tarang sailing expedition in Ratnagiri

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे २ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त मेन्यू २०२७ सागरी नौकावहन मोहिम आखण्यात आली आहे. ६० छात्र शिडाच्या बोटी वाऱ्याची दिशा पाहून २५० किमीचे अंत पार करणार आहेत. २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत 'कोकण ज्ञान तरंग' मोहीमेचे आयोजन केल्याची माहिती कमांडिंग ऑफिसर रामांजुल दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र एनसीसी छात्रांचे मेन्यू पूर्व प्रशिक्षणात मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील १२० कॅडेट्सनी भाग घेतला. यात १०४ नेव्हल, १४ आर्मी, आणि २ वायुसेनेच्या कॅडेट्सनी १० दिवसांचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या शिबिरात छात्रांना सागरी नौकावहन, रोईंग आणि दर्यावर्दी कौशल्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून ६० छात्रांची निवड मोहिमेसाठी करण्यात आली. हे छात्र २७ फूट डीके व्हेलर बोटींमधून रत्नागिरी ते पालशेत आणि परतीचा सागरी प्रवास करणार आहेत.

'कोकण ज्ञान तरंग' अशी असून, "ज्ञान आणि प्रगतीची धरून कास – आदर्श कोकणाचा करूया विकास" हे याचे ब्रीदवाक्य आहे. या मोहीमेचे नाव असून पथनाट्याच्या माध्यमातून मोफत व सक्तीचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश घराघरांत पोहोचवणार आहेत. छात्रांमध्ये साहसी वृत्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी रॅपलिंग आणि समुद्रातील पॅरासेलिंग यांसारख्या साहसी उपक्रमांचे प्रशिक्षणही देण्यात आले. तसेच शिबिरात छात्रांसाठी मत्स्यालय आणि खाडीतील खारफुटी क्षेत्राची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. कॅडेट्सना सागरी जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाचे धडे दिल्याबद्दल एनसीसी महाराष्ट्राच्या वतीने मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आसमंत फाउंडेशनचे आभार मानण्यात आले.

मोहिमेचे वेळापत्रक

२२ ऑक्टोबर भगवती जेटी येथून तिवरी बंदर, २३- तिवरी बंदर ते जयगड पोर्ट, २४- जयगड पोर्ट ते तवसाळ जेटी आणि परत जयगड, २- जयगड पोर्ट ते बोऱ्या बंदर, गुहागर, २६- बोऱ्या बंदर ते पालशेत जेटी, गुहागर, २७- पालशेत जेटी ते बोऱ्या बंदर, २८- बोऱ्या बंदर ते जयगड पोर्ट, २९- जयगड पोर्ट ते तिवरी बंदर, ३०- तिवरी बंदर ते मिऱ्या (काळबादेवी जेटी मार्गे), जयगड / गणपतीपुळे, ३१- मिऱ्या जेटी ते भगवती जेटी. 

"आमचे कॅडेट्स फक्त समुद्राच्या लाटांवर मात करणार नाहीत, तर सामाजिक बदलाचे दूत म्हणून काम करतील. २५० किमीच्या या प्रवासात कॅडेट्स विविध किनारपट्टीच्या भागात पथनाट्य सादर करून सर्वांसाठी सक्तीचे शिक्षण आणि महिला शिक्षण व सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करतील."

- रामांजुल दीक्षित, कमांडिंग ऑफिसर