
देवगड : युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित ‘असिस्टंट ज्यूट क्राफ्ट प्रॉडक्ट्स मेकर’ (Assistant Jute Craft Products Maker) या कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आज, गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी देवगड येथे उत्साहात उद्घाटन पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संचालक श्री. सुधीर पालव, कार्यक्रम अधिकारी सौ. चैत्राली शिर्के आणि प्रशिक्षक श्री. सुरेंद्र तेली यांच्यासह परिसरातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना संचालक श्री. सुधीर पालव यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, "आजच्या काळात प्लास्टिकला पर्याय म्हणून ज्यूट (ताग) पासून बनवलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक तरुण-तरुणी आणि महिलांनी कौशल्य आत्मसात करून स्वतःचा लघुउद्योग सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे."
कार्यक्रम अधिकारी सौ. चैत्राली शिर्के यांनी प्रशिक्षणार्थींना जन शिक्षण संस्थानच्या विविध योजनांची तसेच प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणादरम्यान ज्यूटपासून आकर्षक पिशव्या, शोभेच्या वस्तू आणि दैनंदिन वापरातील विविध उत्पादने तयार करण्याचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रशिक्षक श्री. सुरेंद्र तेली यांनी प्रशिक्षणाच्या तांत्रिक बाजूंबद्दल प्रशिक्षणार्थींशी सविस्तर संवाद साधला.
ताजी बातमी
View all

Chiplun Water Crisis : स्वच्छ पाण्यासाठी चिपळूणकर आक्रमक
November 26, 2026

Vaibhavwadi Child Abuse Case : वैभववाडी तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी
November 26, 2026

सावंतवाडी पंचायत समितीत संविधान दिन उत्साहात
November 26, 2026

Dr. Apoorva Basur : संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात ‘संविधान दिंडी’चे उत्साहात आयोजन
November 26, 2026
संबंधित बातम्या
View all

Chiplun Water Crisis : स्वच्छ पाण्यासाठी चिपळूणकर आक्रमक
November 26, 2026

Vaibhavwadi Child Abuse Case : वैभववाडी तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी
November 26, 2026

सावंतवाडी पंचायत समितीत संविधान दिन उत्साहात
November 26, 2026

Dr. Apoorva Basur : संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात ‘संविधान दिंडी’चे उत्साहात आयोजन
November 26, 2026




