LIVE UPDATES

Chiplun Water Crisis : स्वच्छ पाण्यासाठी चिपळूणकर आक्रमक

नगरपरिषदेसमोर सलग दुसऱ्या दिवशी साखळी उपोषण : खारट व गढूळ पाण्याविरोधात एल्गार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 26, 2026 06:46 PM
views 17  views
Residents of Govalkot, Pethmap and Uktad staging a chain hunger strike outside Chiplun Municipal Council demanding clean drinking water.

चिपळूण : स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याच्या मागणीसाठी गोवळकोट, पेठमाप आणि उक्ताड भागातील नागरिकांनी चिपळूण नगरपरिषद कार्यालयासमोर बुधवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, प्रशासनाच्या निषेधार्थ आणि पाण्याच्या हक्कासाठी नागरिकांनी परिसर दणाणून सोडला आहे.

गोवळकोट जॅकवेलपर्यंत वाशिष्ठी नदीचे पाणीच जात नसल्याने या जॅकवेलवरुन पाणी पुरवठा होणाऱ्या गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप उक्ताड या भागातील हजारो नागरिकांना भरती वेळी जॅकवेलकडे येणारे खाडीचे मुचुल, खारट गढूळ, पाणी दिले जाते. त्यामुळे आम्हालाही चांगले पाणी द्या अशी मागणी नागरिकांसह नगरसेवक सरगुरोह कायम करीत आहोत. याबाबत काही दिवसांपूर्वी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

त्यावेळी नगरपरिषदेने तांत्रिक बाबींचा विचार करत यातील गोवळकोट वगळता अन्य भागांना खेर्डी येथील चांगले पाणी कसे पुरवता येईल यावर उपाय करण्याचे काम सुरू असून २५ नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल असे, आश्वासन दिले होते.

त्यानुसार पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप पाणी सुरू करण्यात आले नसल्याने हे साखळी उपोषण सूर करण्यात आले आहे. उपोषणात पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, स्वच्छ पाणी द्या, नाहीतर खुर्चा खाली करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या उपोषणाला उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षांनी पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे गटनेते मिथिले नरळकर, नगरसेवक अजय भालेकर, फैसल  कासकर, संजय गोताड, नगरसेविका सफा गोठे, वैशाली कदम, नसरीन खडस, माजी नगरसेविका स्वाती दांडेकर अशा अनेकांनी प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दिला.

मात्र पहिल्या दिवशी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी भेट दिली असता चर्चेदरम्यान नगरसेवक यांनी महायुतीचा उल्लेख केला. यावरून नगराध्यक्ष आणि नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या मध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. उपोषणातून राजकारण करू नका असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले. काही वेळासाठी वातावरण तापले होते.

दुसऱ्या दिवशी ही साखळी उपोषण सुरू आहे. या दिवशी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पाणी मिळालं पाहिजे. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण संपणार नाही असे ठणकावून नगरसेवक साजिद यांनी सांगितले.  पाणी हे जीवन आहे. स्वच्छ पाणी मिळणे हा आमचा हक्क आहे. त्यामुळे संघर्ष करावा लागला तरी चालेल. पण न्याय मिळे पर्यंत लढत राहणार असे नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : वेंगुर्ल्यात २७, २८ नोव्हेंबरला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
कासार्डे विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न
November 26, 2026
Devgad News : पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन उत्साहात साजरा
November 26, 2026
Vaibhavwadi Child Abuse Case : वैभववाडी तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी
November 26, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Vengurla News : वेंगुर्ल्यात २७, २८ नोव्हेंबरला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन
November 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
कासार्डे विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न
November 26, 2026
Devgad News : पंचायत समिती देवगड येथे संविधान दिन उत्साहात साजरा
November 26, 2026
Vaibhavwadi Child Abuse Case : वैभववाडी तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी
November 26, 2026