
सिंधुदुर्ग : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज माणगाव खोऱ्यात झंजावती दौरा करत विविध विकासकामांचा आढावा घेतला. गावागावांत, वाडी-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला. निळेली येथील पशुधन संशोधन केंद्राला अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणीही केली.
दौऱ्यादरम्यान निळेली गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेत दत्ता सामंत यांनी त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांचा आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पाठपुरावा करून सोडविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. निळेली येथील पशुधन संशोधन केंद्राला अचानक भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला तसेच प्रत्यक्ष पाहणी केली.
माणगाव खोऱ्यातील नागरिक विविध समस्या घेऊन दत्ता सामंत यांच्याकडे येत असताना, आता ते स्वतः सहकाऱ्यांसह गावागावांत आणि वाडी-वस्त्यांवर पोहोचून लोकांच्या प्रश्नांची जाण घेत आहेत. चाफेली गावातही ग्रामस्थांसोबत बैठक घेत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि विविध अडचणी जाणून घेतल्या. या समस्याही आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुका संघटक रामभाऊ धुरी, विभागप्रमुख दिनेश शिंदे, सचिन धुरी, घावनळे जिल्हा परिषद प्रभारी दत्ता कोरगावकर, दिनेश वारंग, दिलीप सावंत, माणगाव शहरप्रमुख अवी राणे, गोठोस सरपंच सूरज कदम, सत्यवान म्हाडगुत, नंदू परब, रामचंद्र चाळके, सुरेश धुमक, दीपक खरात, सद्गुरू घावनळकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








