LIVE UPDATES

पालकमंत्री नितेश राणेंना आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण

कलमठ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 06:24 PM
views 4  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांना आज आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण होत असून आजच्या दिवशी कलमठ मध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. कलमठ कुंभारवाडी वृंदावन कॉलनी, कलमठ बौद्धवाडी रस्ता खडीकरण , डांबरीकरण कामांचा शुभारंभ जिल्हापरिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला.

१२ वर्षे नितेश राणे यांनी आमदार म्हणून कणकवली मतदारसंघाला न्याय दिलाच. तेवढेच प्रेम कायम कलमठ गावावर करून विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून गावाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली,  मंत्री म्हणून २ वर्षात केलेलं काम कौतुकास्पद असून  राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मेहनत असून त्यांच्या मेहनतीला नेहमी यश मिळो अशी सदिच्छा सरपंच संदिप मेस्त्री यांनी व्यक्त केली.

यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर,उपसरपंच रवींद्र यादव, महेश लाड, सदस्य स्वप्नील चिंदरकर, दिनेश गोठणकर ,श्रेयस चिंदरकर, इफत शेंख, नजराणा शेंख, नितीन पवार, अनुप वारंग, अशोक कदम, किशोर कदम, शकील शेंख, स्वाती नारकर, सुनील कदम, गंगाधर कदम, शैलेश कदम, महेंद्र कदम, सागर कदम,मिलिंद चिंदरकर, रमेश कदम, नंदकुमार कासले,शानू शाह प्रशांत कदम उपस्थित होते.प्रास्ताविक किशोर कदम सर यांनी केले स्वागत गंगाधर कदम, अशोक कदम यांनी केले.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड हायस्कूलात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
November 23, 2026
NSE and BSE stock markets to remain closed on November 24, 2026, for Guru Nanak Jayanti.
Stock Market Holiday : गुरुनानक जयंतीनिमित्त २४ नोव्हेंबरला शेअर बाजार बंद, बाजार पुन्हा कधी उघडणार? वाचा सविस्तर
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
डॉ. जयेंद्र परुळेकरांनी वैद्यकीय पेशा सोडून शेती करावी
November 23, 2026
Sindhudurg Police solve the murder case involving a 56-year-old man whose body was found in a forest area near Redi, Vengurla.
Redi Murder Case Sindhudurg : वडिलांच्या छळाला कंटाळून दोन्ही मुलांनीच केला खून
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड हायस्कूलात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
डॉ. जयेंद्र परुळेकरांनी वैद्यकीय पेशा सोडून शेती करावी
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : सिंधुकन्‍येचा शोधनिबंधपर लेख आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकात प्रकाशित
November 23, 2026
मुळदे ग्रामपंचायतीचा महाराजस्व अभियान उपक्रम स्तुत्य : तहसीलदार सचिन पाटील
November 23, 2026