LIVE UPDATES

Khar road accident : कार अपघात प्रकरणी माजी खासदार सुधीर सावंत यांच्यावर गुन्हा दाखल

खारमध्ये भीषण अपघात : एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
Edited by: Rajat Sawant
Published on: September 30, 2026 13:35 PM
views 63  views
Former MP Sudhir Sawant Booked After Bike Rider Dies

नवी मुंबई : एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने मुंबईतील खार भागात सोमवारी एक भीषण अपघात घडला. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून दुचाकीच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी कारचालक माजी ब्रिगेडियर तथा राजापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुधीर सीताराम सावंत (७१) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी मृत दुचाकीचालक अयप्पा हरिजन (४१) पत्नी नॅन्सी (३७) यांच्यासह सांताक्रूझ येथील आपल्या घरातून खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. यावेळी ते खारमध्ये एका जंक्शनवर पोहचले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने अयप्पा यांच्या स्कूटरला धडक दिली. 

दरम्यान, या धडकेत अयप्पा हे कारखाली अडकले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी अयप्पा यांना बाहेर काढले. यावेळी अयप्पा यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. तर नॅन्सी या दुचाकीवरुन फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. दोघांनाही रिक्षाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अयप्पा यांचा मृत्यू झाला.

कारचालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी कारचालक माजी खासदार सुधीर सावंत (७१) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच कारही जप्त केली आहे. सुधीर सावंत अतिशय वेगाने कार चालवत असल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सुधीर सावंत यांनी १९९१ मध्ये कॉंग्रेसच्या तिकीटावर राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यात त्यांनी मधू दंडवते यांचा पराभव केले. दरम्यान, शिंदेसेना आणि अखेर नोव्हेंबर 2024 मध्ये उ.बा.ठा गटात प्रवेश केला.