LIVE UPDATES

घोटगेवाडी गाव दत्तक, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 30, 2026 13:42 PM
views 41  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

दोडामार्ग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर सेवा संकल्प अभियान राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.या अभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती सदस्या  सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांनी सेवा योगदानासाठी कोनाळ मतदार संघातील घोटगेवाडी गाव दत्तक घेतला आहे. 

या अंतर्गत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी कृषी विभाग व ग्रामपंचायत घोटगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम सायली निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी घोटगेवाडी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रा. सदस्य नुतन पांगम, सुचिता नाईक, ग्रामपंचायत अधिकारी सुजय थेटे, कीर्ती विद्यालयाचे सहा. शिक्षक शरद देसाई , संतोष मेथे , दत्ताराम देसाई, नितीन पांगम, आशा सेविका साक्षी कर्पे, रूपेश देसाई, वासुदेव सावंत, सत्यम सावंत, कीर्ती विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व घोटगेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.