LIVE UPDATES

Royal Enfield Himalayan 440 : रॉयल एनफिल्डची 'हिमालयन ४४०' लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

Royal Enfield Himalayan 440 Info : हिमालयन ४४० मध्ये नवीन ४४३ सीसीचे सिंगल-सिलेंडर, 'लॉन्ग-स्ट्रोक' इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन ६,२५० आरपीएमवर २५.४ बीएचपी पॉवर आणि ४,००० आरपीएमवर ३४ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला नवीन ६-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला असून त्याचे गिअर रेशो सुधारण्यात आले आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 08, 2026 16:15 PM
views 176  views
Royal Enfield Himalayan 440 new motorcycle side profile

नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डने भारतीय बाजारात 'हिमालयन ४४०' (Royal Enfield Himalayan 440) लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत २.२९ लाख रुपये आहे. हिमालयन 440 सेला ब्लॅक, मस्टँग ब्राऊन आणि नेलॉन्ग व्हाइट या तीन नवीन कलरमध्ये उपलब्ध असेल. 'हिमालयन'च्या १० वर्षांच्या प्रवासाचा एक भाग म्हणून ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमध्ये बरेच छोटे मोठे बदल करण्यात आले आहे, त्यामुळे आता आधीच्या हिमालयनपेक्षा थोडी वेगळी दिसतेय.  

ऍडव्हेंचर प्रवासासाठी हिमालयन ४४० मध्ये पुढे २१ इंचाचे आणि १७ इंचाचे मागील 'स्पोक-व्हील' सेटअप कायम ठेवण्यात आले आहे. यात २२० मिमीचे ग्राउंड क्लिअरन्स आणि ८०० मिमीची सीटची उंची देण्यात आली आहे. यामुळे रायडरला आरामदायी अनुभव मिळतो. याची फ्युल टाकी १५ लिटर क्षमतेची आहे. ब्रेकिंगसाठी यात ३०० मिमीचा पुढील डिस्क ब्रेक आणि २४० मिमीचा मागील डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. यात ऑफ-रोड रायडिंगसाठी बंद किंवा चालू करता येणारी 'ड्युअल-चॅनेल एबीएस'ची सुविधा आहे.

हिमालयन ४४० मध्ये नवीन ४४३ सीसीचे सिंगल-सिलेंडर, 'लॉन्ग-स्ट्रोक' इंजिन बसवण्यात आले आहे. हे इंजिन ६,२५० आरपीएमवर २५.४ बीएचपी पॉवर आणि ४,००० आरपीएमवर ३४ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला नवीन ६-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला असून त्याचे गिअर रेशो सुधारण्यात आले आहेत. रॉयल एनफिल्डच्या मते सहाव्या गिअरमुळे हायवेवर आरामदायी प्रवास करणे शक्य होते.

सोशल मीडियावर या बाईकचे फोटो समोर आले. मूळ हिमालयन ४११ मधील फिचर्स असलेला 'मल्टी-पॉड डॅशबोर्ड' यात वापरला जाणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्याऐवजी, कंपनीने हिमालयन 440 मध्ये डिजिटल-ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे. यामध्ये ट्रिपर नॅव्हिगेशन आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंगची सुविधा आहे. तसेच बाईकमध्ये एलईडी हेडलाईट देण्यात आली आहे.

हिमालयन 440 सेला ब्लॅक, मस्टँग ब्राऊन आणि नेलॉन्ग व्हाइट या तीन नवीन कलरमध्ये उपलब्ध असेल. सुरुवातीच्या युनिट्समध्ये फ्युअलच्या टाकीवर एक विशेष '10वी ॲनिव्हर्सरी' बॅज देखील असेल. रॉयल एनफिल्ड हार्ड पॅनियर्स, टॉप बॉक्सेस, टूरिंग सीट्स, ॲडव्हेंचर हँडगार्ड्स, इंजिन गार्ड्स आणि प्रोटेक्टिव्ह गिअर यांसारख्या ॲक्सेसरीजची कॅटेगरी देत ​​आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.29 लाख रुपये इतकी आहे. याचे बुकिंग सुरू झाले आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा शोरूममध्ये जाऊन बाईक बुक करू शकतात. लवकरच याची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.