LIVE UPDATES

करिअर कट्टाने घडविले युवा उद्योजक

कर्ले महाविद्यालयात मैत्री स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उद्योजकतेकडे भरारी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 09, 2026 10:30 AM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : करिअर कट्टा अंतर्गत स्थापन झालेल्या बिझनेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी 'मैत्री हा स्वतःचा स्टार्टअप सुरू केला ही बाब अभिमानास्पद आहे. ​शिक्षणाबरोबरच उद्योजकतेचे धडे गिरवून स्वावलंबनाकडे  टाकलेले पाहिले पाऊल आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता, कौशल्य, संघभावना आणि मेहनतीबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन नक्कीच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष गणपत तावडे यांनी शिरगांव येथे केले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत बिझनेस कल्बच्या माध्यमातून मैत्री  स्टार्टअपचा उद्घाटन सोहळा ८ सप्टेंबररोजी पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात गणपत तावडे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य समिर तारी म्हणाले, करिअर कट्टा उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या कष्टाला व्यवसायिकतेची उर्जा दिली आहे. शिक्षणातून ज्ञान, कौशल्यातून आत्मविश्वास आणि उद्योजकतेतून स्वावलंबन निर्माण होते.  विद्यार्थ्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला उद्योजकतेची दिशा देणारा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असून स्वावलंबनाचे हे धाडस इतरांनाही दिपस्तंभासारखे  प्रेरणादायी आहे असे मार्गदर्शन केले.

कर्लै महाविद्यालयाच्या मैत्री अगरबती या स्टार्टपचे उद्घाटन ओम गणेश मंदीरात विजयकुमार कदम यांच्याहस्ते श्रींच्या चरणी ठेवून करण्यात आले. यावेळी त्यांनी करिअर कट्टा उपक्रमातून युवा उद्योजक घडतील. राष्ट्राच्या जडणघडणीत नवतंत्रज्ञान निर्मितीसाठी त्याचे योगदान मोलाचे ठरणार आहे असे मार्गदर्शन केले    

कार्यक्रमास शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम, संचालक हेमंत देसाई, अमित साटम, मानद अधिक्षक सुधीर साटम, प्रकाश धोपटे, विष्णू पाटणकर, नागेश पवार, शिरगांव हायस्कूल शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, प्राचार्य समिर तारी, करिअर कट्टा समन्वयक प्रा.अक्षता मोंडकर, सहाय्यक प्रा. कोमल पाटील, बिझनेस क्लब अध्यक्ष विराज लाड, सर्व सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्दी सावळे यांनी केले तर उपस्थिताचे आभार सृष्टी पटेल यांनी मानले.