
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या महापुराचा तडाखा त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पाला बसला होता. या बोगद्यात अडकलेल्या दोघा कामगारांना नऊ दिवसानंतर बचाव पथकाने शुक्रवारी सुखरूप बाहेर काढले. या दरम्यान नेपाळ लष्कराच्या बचाव पथकाने 30 वर्षीय संजय साह यांच्यासोबतच ४५ वर्षीय कबीर महर्जन यांनाही जिवंत बाहेर काढले.
बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढल्यानंतर संजय साह या मजुराने सांगितले की, मी त्या बोगद्यात जेव्हा अडकलो होतो तेव्हा सतत 'हरे कृष्ण महामंत्रा'चा जप करत होता. दरम्यान, योगोयोगाने त्यांची सुटका 'कृष्ण जन्माष्टमी'च्या दिवशीच झाली.
VIDEO | Nepal: A person identified as Sanjay Shah rescued alive today from the tunnel of Trishuli–3 'A' Hydropower Project. Visuals of the rescued person.
— Press Trust of India (@PTI_News) September 4, 2026
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/kM7nRYZN9p
सप्तरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले संजय साह (वय ३०) हे मधेश प्रांतातील 'नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी'चे कर्मचारी आहेत. बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या दोन कामगारांपैकी ते एक आहेत.
सुटकेनंतर साह यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले की, मी गेल्या नऊ दिवसांपासून 'हरे कृष्ण' महामंत्राचा जप करत होतो.". बचाव पथकातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साह यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही आरोग्यविषयक समस्या नाही. त्यांना त्रिशूली येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला, कबीर महर्जन (वय ४५) यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरद्वारे काठमांडू येथील छाउनी स्थित नेपाळ आर्मी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










