LIVE UPDATES

Upcoming IPO : शेअर बाजारात येतोय कृषी क्षेत्रातील मोठा IPO! 'या' तारखेपासून गुंतवणुकीची संधी; जाणून घ्या सविस्तर

Crystal Crop Protection IPO : १९९४ मध्ये सुरु झालेली ही कंपनी पिकांच्या संरक्षणासाठी विविध उपाय उपलब्ध करून देते. कंपनीच्या उत्पादनांच्या कॅटेगरीमध्ये तणनाशके, बुरशीनाशके आणि कीटकनाशकांचा समावेश आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 01:27 PM
views 55  views
Crystal Crop Protection IPO details including issue size, price band and opening date.

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील एक कंपनी शेअर बाजारात आपला आयपीओ लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. सुमारे ३२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या 'क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड' कंपनीचा आयपीओ येणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ १८ नोव्हेंबरपासून खुला होणार आहे. चला तर या आयपीओबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

१९९४ मध्ये सुरु झालेली 'क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन' कंपनी पिकांच्या संरक्षणासाठी विविध उपाय उपलब्ध करून देते. कंपनीच्या उत्पादनांच्या कॅटेगरीमध्ये तणनाशके, बुरशीनाशके आणि कीटकनाशकांचा समावेश आहे. तसेच कंपनी नैसर्गिक पीक उपायही पुरवते. यामध्ये बायो-स्टिम्युलंट्स, बायो-प्रोटेक्टंट्स, वनस्पती वाढ नियामक, द्रव खते आणि सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश आहे.

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडचा आयपीओ ४५६ कोटी रुपयांचा असून तो १८ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. या आयपीओसाठी प्रति शेअर २५९ ते २७२ रुपयांची प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओमध्ये ३५५ कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत, तर १०१ कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स 'ऑफर फॉर सेल' अंतर्गत विकले जाणार आहेत.

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनच्या आयपीओ अंतर्गत शेअर्सचे वाटप २३ नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. ज्या अर्जदारांना शेअर्स मिळालेले नाहीत, त्यांना २५ नोव्हेंबरपासून परतावा देण्यास सुरुवात होईल. ज्यांना शेअर्सचे वाटप झाले आहे त्यांच्या डीमॅट खात्यात हे शेअर्स जमा केले जातील. हे इक्विटी शेअर्स २६ नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसई वर लिस्ट होण्याची अपेक्षा आहे.

या आयपीओसाठी 'डॅम कॅपिटल ॲडव्हायझर्स', 'आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस' आणि 'मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स' हे 'बुक-रनिंग लीड मॅनेजर्स' आहेत. तर 'एमयूएफजी इनटाइम इंडिया' यांची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(डिस्क्लेमर : माहिती शेअर करण्याच्या उद्देशाने हा लेख देण्यात आला आहे. गुंतवणुकीचा सल्ला या लेखात देण्यात आलेला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम असते. त्यामुळे स्वतःच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणुक करा. गुंतवणूक करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा...)


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : ओरोसच्या मुख्य रस्त्यांच्या कामाला अखेर सुरुवात
November 13, 2026
India vs New Zealand fourth ODI match where New Zealand defeated India by 244 runs.
भारताचा २४४ धावांनी लाजिरवाणा पराभव! रोहित, विराट आणि श्रेयस शून्यावर बाद
November 13, 2026
TVS NTORQ 150 scooter in the newly introduced Spectral Green colour
TVS NTORQ 150 च्या चाहत्यांसाठी खुशखबर! नवीन 'स्पेक्ट्रल ग्रीन' कलर लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 13, 2026
Amitabh Bachchan returns to the sets of Kaun Banega Crorepati 18 after recovering from seasonal flu.
KBC 18 Season : 'कौन बनेगा करोडपती १८'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा दमदार कमबॅक
November 13, 2026
संबंधित बातम्या

View all

TVS NTORQ 150 scooter in the newly introduced Spectral Green colour
TVS NTORQ 150 च्या चाहत्यांसाठी खुशखबर! नवीन 'स्पेक्ट्रल ग्रीन' कलर लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 13, 2026
Amul and Mother Dairy milk price hike in India from November 12 2026
सामान्यांच्या खिशाला बसणार महागाईचा फटका! दूधाच्या दरात २ ते ६ रुपयांची वाढ; पाहा नवीन दर
November 12, 2026
President of India Droupadi Murmu
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई देशात अव्वल तर स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या यादीत रत्नागिरीचा तिसरा क्रमांक
November 11, 2026
CRPF jawans deployed in Kulgam after terrorist attack in Jammu and Kashmir.
Kulgam Terror Attack : सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला
November 11, 2026