LIVE UPDATES

TVS NTORQ 150 च्या चाहत्यांसाठी खुशखबर! नवीन 'स्पेक्ट्रल ग्रीन' कलर लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

TVS NTORQ 150 Spectral Green : इतर कलरच्या पर्यायांच्या तुलनेत या नवीन कलरमध्ये गडद ऑलिव्ह ग्रीनचा वापर केला असून समोरच्या मडगार्डवर आणि मागील भागावर गडद पिवळ्या कलरचे हायलाइट्स दिले आहेत.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 01:54 PM
views 87  views
TVS NTORQ 150 scooter in the newly introduced Spectral Green colour

मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांच्या लोकप्रिय एनटॉर्क 150 (NTORQ 150) स्कूटरमध्ये 'स्पेक्ट्रल ग्रीन' (Spectral Green) हा नवीन कलर लॉन्च केला आहे. हा नवीन कलर गेल्या महिन्यात एका डीलरशिपवर दिसला होता आणि आता तो अधिकृतपणे कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आला आहे. हा पर्याय केवळ 'टीएफटी' व्हेरिएंटसाठी आहे. 'स्पेक्ट्रल ग्रीन'च्या समावेशासह आता एनटॉर्क 150 टीएफटी एकूण चार कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात नायट्रो ग्रीन, रेसिंग रेड आणि टर्बो ब्लू हे तीन कलर आहेत.

इतर कलरच्या पर्यायांच्या तुलनेत या नवीन कलरमध्ये गडद ऑलिव्ह ग्रीनचा वापर केला असून समोरच्या मडगार्डवर आणि मागील भागावर गडद पिवळ्या कलरचे हायलाइट्स दिले आहेत. या मध्ये काळ्या कलरची चाके दिली आहेत. तर इतर तीन कलर पर्यायांमध्ये अधिक उठावदार, चमकदार कलरची चाके पाहायला मिळतात. 

स्कूटरच्या मॅकेनिझममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एनटॉर्क 150 मध्ये १४९.७ सीसीचे, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन १३.२ एचपी पॉवर आणि १४.२ एनएम टॉर्क जनरेच करते. टीएफटी व्हेरिएंटमध्ये ५ इंचाचा कलर टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. याची किंमत १.२२ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे, तर स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत १.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : ओरोसच्या मुख्य रस्त्यांच्या कामाला अखेर सुरुवात
November 13, 2026
India vs New Zealand fourth ODI match where New Zealand defeated India by 244 runs.
भारताचा २४४ धावांनी लाजिरवाणा पराभव! रोहित, विराट आणि श्रेयस शून्यावर बाद
November 13, 2026
Crystal Crop Protection IPO details including issue size, price band and opening date.
Upcoming IPO : शेअर बाजारात येतोय कृषी क्षेत्रातील मोठा IPO! 'या' तारखेपासून गुंतवणुकीची संधी; जाणून घ्या सविस्तर
November 13, 2026
Amitabh Bachchan returns to the sets of Kaun Banega Crorepati 18 after recovering from seasonal flu.
KBC 18 Season : 'कौन बनेगा करोडपती १८'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा दमदार कमबॅक
November 13, 2026
संबंधित बातम्या

View all

Crystal Crop Protection IPO details including issue size, price band and opening date.
Upcoming IPO : शेअर बाजारात येतोय कृषी क्षेत्रातील मोठा IPO! 'या' तारखेपासून गुंतवणुकीची संधी; जाणून घ्या सविस्तर
November 13, 2026
Amul and Mother Dairy milk price hike in India from November 12 2026
सामान्यांच्या खिशाला बसणार महागाईचा फटका! दूधाच्या दरात २ ते ६ रुपयांची वाढ; पाहा नवीन दर
November 12, 2026
President of India Droupadi Murmu
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई देशात अव्वल तर स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या यादीत रत्नागिरीचा तिसरा क्रमांक
November 11, 2026
CRPF jawans deployed in Kulgam after terrorist attack in Jammu and Kashmir.
Kulgam Terror Attack : सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला
November 11, 2026