LIVE UPDATES

Mumbai Goa Highway Accident : अंजणारी पुलावर लक्झरी बसला ट्रकची दुहेरी धडक

8 प्रवाशांची प्रकृती गंभीर : धडकेनंतर बस तब्बल २०० मीटर फरफटत जाऊन पलटी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 13, 2026 12:26 PM
views 111  views

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने खासगी लक्झरी बसला मागून दोन वेळा जोरदार धडक दिल्याने बस महामार्गावर पलटी झाली. या भीषण अपघातात बसमधील तब्बल ३० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने अंजणारी पुलावर लक्झरी बसला मागून जोरदार धडक दिली. पहिल्या धडकेनंतर काही क्षणांतच ट्रकची बसला पुन्हा जोरदार धडक बसली. या दुहेरी धडकेमुळे बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस महामार्गावरच पलटी झाली. धडक इतकी भीषण होती की, पलटी झालेली बस तब्बल २०० मीटरपर्यंत रस्त्यावर फरफटत गेली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्यांनी घटनास्थळाचा परिसर हादरून गेला.

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा आणि लांजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातामुळे अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

या अपघातातील सर्व ३० जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकांमधून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली तसेच लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


ताजी बातमी

View all

Amitabh Bachchan returns to the sets of Kaun Banega Crorepati 18 after recovering from seasonal flu.
KBC 18 Season : 'कौन बनेगा करोडपती १८'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा दमदार कमबॅक
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : कोकण रेल्वेचे ध्यासस्वप्न मधू दंडवतेंनी सत्यात उतरवले
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : आदित्य कदमची महाराष्ट्राच्या U-19 फुटबॉल संघात निवड
November 13, 2026
Uday Samant announces Janajatiya Gaurav Diwas Seva Saptah programmes for tribal communities in Ratnagiri
‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : कोकण रेल्वेचे ध्यासस्वप्न मधू दंडवतेंनी सत्यात उतरवले
November 13, 2026
Uday Samant announces Janajatiya Gaurav Diwas Seva Saptah programmes for tribal communities in Ratnagiri
‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा
November 12, 2026
Devgarh BJP members celebrate Palawarachi Diwali 2026 with the Katkari community at Munge village
मुणगे कातकरी वस्तीवर रंगली पालावरची दिवाळी
November 12, 2026
Villagers cleaning the historic pond near the 14th-century Laxminarayan Temple in Valaval, Kudal
Valaval Laxminarayan Temple : ७०० वर्षांच्या ऐतिहासिक वालावल मंदिर तलावाची दुरवस्था
November 12, 2026