
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने आज, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता हा अत्यल्प मुदतीचा हवामान अंदाज (Nowcast) प्रसिद्ध केला आहे. या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ तासांच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या लखलखाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाचा संभाव्य वेग प्रति तास सुमारे ५ मिमी इतका राहण्याचा अंदाज असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन विभागातर्फे पिवळा इशारा (Yellow Alert) देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेची शक्यता पाहता नागरिकांनी, विशेषतः शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी, पावसादरम्यान झाडांखाली, पाण्याच्या स्रोतांजवळ, धातूच्या खांबाजवळ किंवा मोकळ्या मैदानात उभे राहणे टाळावे. अचानक उद्भवणाऱ्या अशा हवामानात पाळीव जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात बांधावे तसेच घरात असताना वीज उपकरणांचा वापर टाळून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








