LIVE UPDATES

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी’ संगीत मैफल

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 24, 2026 07:18 PM
views 20  views

सावंतवाडी : सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषद आयोजित त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हे चांदणे फुलांनी’ या विशेष संगीत मैफलीचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी सभापती दीपाली भालेकर, प्रा. सुभाष गोवेकर, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख निलेश मेस्त्री, किशोर सावंत, संजय कात्रे, निरज भोसले आदी मान्यवर तसेच सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या चांदण्यांच्या साक्षीने रंगणाऱ्या या संगीत मैफलीमुळे संगीतप्रेमींना सुरेल पर्वणी अनुभवण्याची संधी मिळाली आहे.