
वेंगुर्ला: तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान मातोंड गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचे आज जत्रोत्सवाला जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पं स सभापती शंकर घारे, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, कमलेश गावडे आदी लोकप्रतिनिधींनी भेट देत आई सातेरीचे दर्शन घेतले.
यावेळी मातोंड देवस्थानचे प्रमुख गावकर उदय परब, रविकिरण परब, तुकाराम परब, दिगंबर परब यांनी श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी देवस्थान कमिटी सचिव एम. जी. मातोंडकर, सूर्यकांत आजगावकर, सामाजिक कार्यकर्ते जगदीश परब, सुभाष सावंत, अशोक परब-भरडकर, दीपक परब, ग्रा प सदस्य दिपेश परब, प्राथमिक शिक्षक दिपेश परब, राजू परब, तुषार साळगावकर, मारुती दौडशानट्टी आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








