
सावंतवाडी : दक्षिण कोकणच पंढरपूर सोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून मंदिर परिसरात व्यापारी तसेच ग्रामस्थांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. संपूर्ण गावात उत्सवानिमित्त धार्मिक वातावरण तयार झाले असून मंदिर परिसरामध्ये मंडप व विद्युत रोषणाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी जत्रा म्हणून सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या लोंटागणाच्या जत्रेकडे पाहिले जाते. यावर्षी बुधवारी 25 नोव्हेंबरला हा जत्रोत्सव साजरा होत आहे. जत्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्णत्वास आली असून देवीच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी पाहता भाविकांना सावलीसाठी मंदिर परिसरामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सर्वांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.
दुसरीकडे मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुकान व्यवसायिक तसेच हॉटेल व्यवसायिक व अन्य विविध फुले विक्रेत्या आईस्क्रीम कडून मंडप उभारून दुकाने थाटण्यात आली आहेत. दरवर्षी पावसाची शक्यता लक्षात घेता व्यवसायिकांनी प्लास्टिकचे छत मंडपावर टाकले आहे. एस टी महामंडळाकडूनही जत्रोत्सवासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








