LIVE UPDATES

तळेबाजार सोसायटीच्या गोडाऊनमध्ये शिरलेल्या कोब्राला जीवदान

सर्पमित्र सुदेश पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सापाला सोडले नैसर्गिक अधिवासात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 01, 2026 20:49 PM
views 568  views

देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील सोसायटीच्या गोडाऊनमधील पोत्यांमध्ये शिरलेल्या इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा जातीच्या विषारी सापाला सर्पमित्र सुदेश पाटील यांनी जीवदान दिले. सापाला सुरक्षितपणे बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

तळेबाजार सोसायटीच्या गोडाऊनमध्ये साप शिरल्याची माहिती जागरूक नागरिक विनायक शिवाजी सावंत यांनी सर्पमित्र सुदेश पाटील यांना दिली. माहिती मिळताच सुदेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी गोडाऊनमधील पोत्यांमध्ये इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा जातीचा विषारी साप असल्याचे निदर्शनास आले.

साप पोत्यांमध्ये शिरल्याने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आव्हान होते. सर्पमित्र सुदेश पाटील यांनी आपले सहकारी जयदीप पाटील यांच्या मदतीने सापाला काळजीपूर्वक बाहेर काढले. त्यानंतर सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या वेळी सुनील शांताराम धरणे, रविंद्र हरी कुळये, विनायक शिवाजी सावंत, रिया विलास लाड, जयप्रकाश हरी लाड यांच्यासह सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते. सर्पमित्रांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे विषारी सापाला जीवदान मिळाले.