
मुंबई : गुंतवणूकदारांसाठी एफडी हा आजही गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये एफडी करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच बँका एफडीवर आकर्षक परतावा देत आहेत. सध्या काही बँका एफडीवर ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम एफडी व्याजदर कोणत्या बँका देत आहेत, ते आपण जाणून घेऊया.
'या' बॅंका देत आहेत ८ टक्के व्याजदर
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ वर्षांच्या एफडीवर ८.०५ टक्के व्याज देत आहे. जना स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८ टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ वर्षांच्या एफडीवर एयू स्मॉल फायनान्स बँक ७.२५ टक्के व्याजदर , इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ७.५० टक्के व्याजदर, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक ६.७५ टक्के व्याजदर आणि स्लिक स्मॉल फायनान्स बँक ७.२५ टक्के व्याजदर देत आहेत. हे दर ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी लागू आहेत.
इतर बँका कोणते व्याजदर देत आहेत?
स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याजदर जाहीर केले आहेत. एचडीएफसी बँक ४ वर्षे, ७ महिने आणि १ दिवस कालावधीच्या एफडीवर ६.९० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक ५ वर्षांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देत आहे.
पीएनबी ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.८५ टक्के व्याज देत आहे, तर ॲक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्के व्याज देत आहे. जर मुदत ठेवीवर मिळणारे व्याज १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर टीडीएस कापला जातो. दरम्यान, संबंधित व्यक्ती परताव्यासाठी पात्र असल्यास, इन्कम टॅक्स रिटर्न भरून हा टीडीएस परत मिळवता येतो.
(डिस्क्लेमर - गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याआधी संबंधित बॅंकेत जाऊन एफडीच्या योजनेबाबत माहिती जाणून घ्यावी व त्यानंतरच गुंतवणूक करावी. दर्शवलेले व्याज आणि मॅच्युरीटी रक्कम केवळ अंदाजे किंवा माहितीसाठी आहे. प्रत्यक्ष दर बँक किंवा संस्थेच्या नियमांनुसार बदलू शकतात आणि यावर आयकर नियमांनुसार टीडीएस लागू शकतो.)
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










