
सावंतवाडी : दशावतार हा कोकणची शान असून कोकणवासियांचा गर्व आहे. ध्येय आणि दृष्टी देण्याचं काम कोकणसाद मीडियाच्या माध्यमातून होत. कोकणसादनं दिवाळी अंकाच्या माध्यमातून दशावतार कलेला दिलेलं व्यासपीठ हे स्तुत्य स्वरूपाचे आहे. या कलेला अन् मोठ्या नफ्याची अपेक्षा न ठेवता वारसा म्हणून जपली जाणाऱ्या कलेचा खऱ्याअर्थानं गौरव केला गेलाय असे उद्गार सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी काढले. तसेच मुखपृष्ठावर छायाचित्र असणाऱ्या सुप्रसिद्ध स्त्री कलाकार युवा दशावतार कलावंत यश जळवी यांचेही त्यांनी कौतुक केलं. कोकणसादच्या प्रधान कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नाटकात स्त्री पार्ट साकारणाऱ्या यश जळवी यांनी आपल्या नाटकातील पात्राच्या वेशात सोहळ्यास उपस्थिती दर्शविली होती. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध स्त्री कलाकार युवा दशावतार कलावंत यश जळवी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सौ. भोंसले म्हणाल्या, दिवाळी अंकाची संकल्पना बघून फार आनंद झाला. दशावतार कलेला व्यासपीठ देण्याच काम कोकणसाद मीडियाच्या माध्यमातून झालं आहे. एक ध्येय, दृष्टी देण्याच काम कोकणसाद करत आहे. अयोग्य ते अयोग्य अन् योग्य ला योग्य म्हणणारी ही वृत्तसंस्था आहे असे मत व्यक्त केले. तर युवा कलावंत यश जळवी स्त्री वेशात फार सुंदर दिसतात. आज त्यांनी नफा अन् इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा कला जपण्याला महत्व दिलं. त्यांचे हे योगदान अतुलनीय आहे असे उद्गार त्यांनी काढले.
दरम्यान, मनोगत व्यक्त करताना कलावंत यश जळवी हे भावूक झाले. आज दशावतार कला सातासमुद्रापार गेली असून जगभरात दिसत आहे. त्यात कोकणसादमुळे माझी कला आणि मी जगभरात पोहचणार आहोत याचा आनंद आहे. यावर्षीच्या अंकाच्या मुखपृष्ठावर मी आहे तसेच माझ्या कोकणातील दशावतार यात वाचता येणार आहे. कोकणची चित्रपट सृष्टी म्हणजे ही दशावतार कला आहे. दशावतार कलावंतांकडे मिळणारा सन्मान अन् प्रेम इतर कोणत्याही कलाकाराला मिळत नाही. आज कोकणसादनं मला तो मान दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. तसेच याचे श्रेय माझे गुरू, मार्गदर्शक व आई-वडीलांना देत असल्याचे उद्गार त्यांनी काढले. तर उपस्थित नगरसेविका नीलम नाईक यांनी देखील मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी दिवाळी अंकामागील संकल्पना विशद केली. आभार मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक अनुजा कुडतरकर यांनी केलं. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर, नगरसेविका नीलम नाईक, सुप्रसिद्ध स्त्री कलाकार युवा दशावतार कलावंत यश जळवी, मुख्य उपसंपादक स्वप्नील परब, छायाचित्रकार स्वरूप कासार आदींसह टीम कोकणसाद उपस्थित होती.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








