
सावंतवाडी : 'द बॉबीन डिझाईनर स्टुडिओ'चा सावंतवाडीत शानदार शुभारंभ करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंची विशेष उपस्थिती होती.
या दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कुडाळनंतर आता सावंतवाडीमध्ये हा ब्रँड आला असून ग्राहकांना दर्जेदार सेवा इथे उपलब्ध होणार आहे. शार्दुल घुर्ये, अनिकेत सामंतनेवाळकर यांच्या माध्यमातून हे दालन सावंतवाडीकरांसाठी खुल झालं असून मंत्री श्री. सामंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंनी देखील शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान 'द बॉबीन डिझाईनर स्टुडिओ' कडून करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, द बॉबीन डिझाईनरचे शार्दुल घुर्ये, अनिकेत सामंतनेवाळकर, द्वारकानाथ घुर्ये, जगदिश नेवाळकर, संजय पडते, संजय आंग्रे ॲड. पी. डी. देसाई, विजय तेंडुलकर, आनंद सामंत, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, बाबा टोपले, केशव सामंत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








