LIVE UPDATES

ब्रँड बातमीचा, विश्वास 200K चा !

डिजिटल विश्वात ‘कोकणसाद LIVE’चा डंका ; फेसबुक पेजने ओलांडला २ लाखांचा (200K) टप्पा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 17:11 PM
views 12  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्ग :  कोकणच्या लाल मातीशी, निसर्गाशी आणि इथल्या कष्टकरी माणसांशी घट्ट नातं जपत निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या ‘कोकणसाद LIVE’ या महाचॅनेलने यशाचे आणखी एक शिखर सर केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून कोकणातील प्रत्येक घडामोडीला वाचा फोडणाऱ्या ‘कोकणसाद LIVE’च्या फेसबुक पेजने तब्बल २ लाख (200K) फॉलोअर्सचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. डिजिटल माध्यमांच्या जगतात असा कीर्तिमान रचणारे ‘कोकणसाद LIVE’ हे कोकणातील अग्रगण्य आणि नंबर १ चे महाचॅनेल ठरले आहे.

गेल्या एका तपाहून अधिक काळात 'कोकणसाद LIVE'ने केवळ बातमी देण्याचे काम केले नाही, तर तो प्रत्येक कोकणवासीयाचा हक्काचा आवाज आणि विश्वासाचे व्यासपीठ बनला आहे. स्थानिक समस्यांची तातडीने तड लावणे, सत्य घटनांची आक्रमक व निष्पक्ष मांडणी करणे आणि कोकणच्या समृद्ध लोककलेचा व संस्कृतीचा गौरव करणे, या सर्व गोष्टींना चॅनेलने नेहमीच प्राधान्य दिले आहे. तळागाळातील सामान्य जनतेच्या हितासाठी केलेली हीच प्रामाणिक पत्रकारिता आज या ऐतिहासिक यशाचे कारण ठरली आहे.

या यशानंतर प्रतिक्रिया देताना चॅनेलचे मुख्य संपादक सागर चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रेक्षक, वाचक व पाठीराख्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. "हे यश आमचे एकट्याचे नसून संपूर्ण कोकणवासीयांच्या अथांग प्रेमाची आणि विश्वासाची पावती आहे. भविष्यातही कोकणच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आमचा हा लढा असाच अविरत आणि निर्भीडपणे सुरू राहील," असा विश्वास संपादक सागर चव्हाण यांनी व्यक्त केला.