
मुंबई : फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता 58 टक्क्यांवरुन 60 टक्के करण्यात आला असून 1 जानेवारी 2026 पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra government employees DA hike)
राज्य सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्ता वाढ ही 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.
नवीन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन संरचनेतील मुळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार 1 जानेवारी ते 31 जुलै 2026 या 7 महिन्यांच्या कालावधीची थकबाकी ऑगस्ट 2026 च्या वेतनासोबत रोखीने कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.














