
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदांवर भरतीसाठी सहकार खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सहकार खात्याकडून ३२ रिक्त शिपाई पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बँकेने कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर या संस्थेची निवड केली असून त्या संस्थेमार्फत भरती प्रक्रिया प्रोसेस सुरू केली आहे. (Sindhudurg DCC Bank Peon Recruitment 2026)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य
३२ रिक्त शिपाई पदांची सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना जिल्ह्यातील रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच शिपाई पदासाठी किमान २१ व कमाल ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवाराचा जन्म ३०/०८/२००५ नंतरचा व ३०/०८/१९८६ यापूर्वीचा नसावा. (Sindhudurg DCC Bank Recruitment: 32 Peon Posts Announced)
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता
शिपाई पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहेत. पदभरतीची जाहिरात असोसिएशनच्या http://www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावर २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत पहावयास उपलब्ध राहील.
परिक्षे संबंधी माहिती
शिपाई पदाच्या भरतीसाठी रविवारी ६ सप्टेंबर २०२६ रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिक्षा केंद्र दिले जाणार आहे. उमेदवाराला कॉल लेटर इत्यादी माहिती उमेदवाराच्या मेलवर पाठविली जाईल. उमेदवाराने कॉल लेटर डाऊनलोड करून त्याची प्रत काढावयाची आहे. उमेदवार परीक्षा केंद्रावर जाताना परीक्षा कॉल लेटर, सहीत ओळखीसाठी आधारकार्ड/पॅनकार्ड (ओरिजनल) सोबत असणे आवश्यक राहील. परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामधून गुणानुक्रमे आवश्यक उमेदवारांना तोंडी मुलाखतीस बोलविणेत येईल.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी एजन्सीच्या help@kopbankasso.co.in या ईमेलवर अथवा ७४९८८५०४२९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










