केंद्र, राज्य सरकार डिजीटल मीडिया संपादक - पत्रकार संघटनेच्या पाठीशी !

डिजीटल मीडियाचे प्रश्न, समस्या सोडवण्यास प्राधान्य | पहिल्याच अधिवेशनात मंत्रीमहोदयांची ग्वाही !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 29, 2022 21:26 PM
views 189  views
हायलाइट
महाराष्ट्र महागौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
कोकण विभागातून शेकडो सदस्यांचा सहभाग
'डिजिटल मीडिया : नवे माध्यम' या विषयावर झाला परिसंवाद !

महाबळेश्वर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन भिलार महाबळेश्वर येथे मोठ्या उत्साहात पार पडल. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोकण विभागातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील संघटनेचे संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीत 'महाराष्ट्र महागौरव पुरस्कारां'च वितरण करण्यात आलं. सिंधुदुर्गतील भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक-अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांंना देखील महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.


पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर येथे हे अधिवेशन पार पडल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, डिजिटल मिडीया संपादक, पत्रकार संघटनेचे देशातील पहिले राज्यस्तरीय अधिवेशन भिलार या माझ्या गावी होत आहे याचा आनंद होत आहे. देशातील पहिल पुस्तकाचे गाव असलेल्या भिलारी गावाची आशिवेशनासाठी केलेली निवड योग्य आहे. डिजिटल मीडियाचे प्रश्न, समस्या ह्या राज्य आणि केंद्र सरकार पर्यंत नक्कीच पोहोचवल्या जातील. बातमीची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. एक आदर्श आचारसंहिता सर्व घटकांसाठी या संघटनेने करावी. डिजिटल मीडिया ही काळाची गरज आहे. आपण एक डिजिटल क्रांती घडवूया. राज्य आणि केंद्र सरकरचे सर्व उपक्रम लोकापर्यंत पोहोचवा. डिजिटल चॅनेलच्या परवानगीबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून डिजिटल चॅनेलच्या समस्या मार्गी लावणार अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही डिजिटल पद्धतीने ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनाच प्रास्ताविक विकास भोसले यांनी केल, तर संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य आहे. देशाने आपल्या राज्याकडून काहीतरी घ्यावे, असाच आपला महाराष्ट्र आहे. तसचं डिजिटल मीडियाच आहे. महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया देशासाठी आदर्शवत आहे. कोविड काळात महाराष्ट्राला, जगाला डिजिटल मिडीयाच महत्व कळलं. याच काळात डिजिटल मिडीयान महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे जशी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. तशी डिजिटल मीडियाची राजधानी मुंबई व्हावी, त्यासाठी जे धोरण ठरवायचे ते ठरवा. यासह डिजिटल मीडियाच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी राज्याचे डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे.


राजा माने म्हणाले, कोविड काळात डिजिटल मिडीयान महत्वाची भूमिका पार पाडली. त्याच काळात चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली. राज्यातील सर्व डिजिटल पत्रकारांनी एकत्र येऊन संघटना बांधणीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या. त्यांच्याच सूचनेनुसार हे अधिवेशन होत आहे. डिजिटल मीडियाचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वसन दिले होते. त्यानंतर संघटनेची स्थापना करून आज हे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. डिजिटल मिडीया पत्रकारांना अनेक अडचणी येत आहेत. त्या सर्व समस्या सोडवणे गरजचे आहे. आम्हाला मान सन्मान द्या. डिजिटल मीडियाचे 2021 साली डिजिटल जाहिरातीचा 41 हजार कोटींचा टर्नओव्हर झाला. 2024 साली हा आकडा 80 हजार कोटीच्या पुढे जाईल. जशी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. तशी डिजिटल मीडियाची राजधानी मुंबई व्हावी, त्यासाठी जे धोरण ठरवायचे ते ठरवा. आमच्या संघटनेला अधिस्विकृती समितीवर स्थान द्या. गाव पातळीवर डिजिटल मिडीयत काम करताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर डिजिटल मीडिया पत्रकाराला ओळखपत्र देण्यासाठी  जिल्हा प्रशासनाला आदेश द्या, अशी मागणी अध्यक्ष राजा माने यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे.



यावेळी डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आ.जयकुमार गोरे, राजेश क्षीरसागर यांच्यासह उपस्थितांच स्वागत केले. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच स्वागत कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी केल. तर संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई म्हणाले, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अनेक अडचणी येतात. स्थानिक पातळीवर पत्रकारांना ओळखपत्राचा आणि अधिस्विकृतीचा  विषय मोठा आहे. मी स्वतः गृहराज्यमंत्री असताना अनेक प्रश्न आपल्याकडे आले होते. मात्र, कुठचा पत्रकार अधिकृत आणि अनधिकृत हे समजत नव्हते. त्यामुळे निर्णय घेता येत नव्हता. मात्र, आता तुम्हीच या संघटनेमार्फत ज्या काही सूचना, समस्या, मागण्या आहेत, त्याबाबत जे काही धोरण ठरवायचे आहे ते ठरवूया. डिजिटल मिडीयाचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून सर्व समस्या मार्गी लावल्या जातील. अशी ग्वाही अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई म्हणाले, डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अधिवेशन भिलार गावात व्हावे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच सूचना होती. मुख्यमंत्र्यांना अचानक नंदुरबार येथे जावे लागले. मात्र, त्यांनी डिजिटल मिडीयाचे प्रश्न समजावून घेण्याच्या सूचना त्यांनी आपल्याला केल्या आहेत. या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवून यावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतले जातील. राज्यातील सर्व डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना राजा माने यांनी संघटित केले हे कौतुकास्पद आहे. डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.


सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ते साताऱ्याची तऱ्हा आणि कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमापासून ते भिलार महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपर्यंत अतिशय खुमासदार भाषण करत  उपस्थितांची भरभरून दाद मिळवली. ते म्हणाले, सर्वात पहिल्याचा गोडवा वेगळाच असतो. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे देशपातळीवरच पहिलं अधिवेशन या भूमीत होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पहिलं मौखिक त्यानंतर लिखित, मुद्रित आणि सध्या डिजिटल या प्रवासात सातारा जिल्ह्याच्या या भूमीचं मोठं योगदान आहे. आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या निश्चितपणे मंत्री शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील. आम्ही आक्रमक नाही प्रसारक आहोत, असं सांगत ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अगदी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत चांगले मुख्यमंत्री या भूमीने राज्याला दिले आहेत. या भूमीला मोठी परंपरा आहे. आपली सुरुवात या भूमीतून होते आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या मागण्यांना निश्चितपणे पूर्ण होतील.


मंत्री दीपक केसरकर म्हणाले, डिजिटल इंडियाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. केंद्राकडून यावर नक्कीच ठोस निर्णय होईल. मात्र, सध्यस्थितीत राज्य सरकारच्या वतीने आम्ही डिजिटल मिडीयाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरकारच्या वतीने जसे प्रिंट मिडीयाचे नियम, अटी आहेत तशा डिजिटल मीडिया सुद्धा सरकारच्या वतीने त्या पत्रकारांना न्याय मिळवून दिला पाहिजे. ही इलेक्ट्रॉनिक क्रांती आहे. सध्या डिजिटल मीडियाचे युग आहे. राज्य सरकारचे निर्णय सुद्धा एका क्षणात डिजिटल मीडियादवारे सर्वत्र पसरतात. त्यामुळे डिजिटल मिडीयाचे प्रश्न मुख्यमंत्री लवकरच मार्गी लावतील. झटपट निर्णय घेणे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे. त्यामुळे डिजिटल मिडीयच्या पत्रकारांना लवकरच न्याय मिळेल. असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. डिजिटल मिडीयाची सुरुवात कमी खर्चात होते. अनेकांनी छोटे छोटे स्टुडिओ स्थापन केले आहे. पण डिजिटल मीडिया ह्या शस्त्राचा योग्य वापर झाला पाहिजे. या मीडियामुळे एखाद्याचा फायदा सुद्धा होईल आणि एखाद्याचे आयुष्य सुद्धा उध्वस्थ होऊ शकते. त्यामुळे शोध पत्रकारिता आणि बातमीची पडताळणी करून बातम्या फ्लॅश करणे आवश्यक असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.



या दरम्यान, संघटनेच्या स्मरणीकेच प्रकाशन करण्यात आल. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना ''महाराष्ट्र महागौरव'' पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये कराड येथील डॉ. सुरेश भोसले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, निर्माता दिग्दर्शक मंगेश देसाई, श्रीमती चेतना सिन्हा, दिग्दर्शक बापूराव कऱ्हाडे, उस्मानाबाद येथील डॉ. प्रतापसिंह पाटील, सिंधुदुर्गचे अच्युत सावंत-भोंसले, सोलापूरचे श्रीकांत मोरे नागपूर येथील डॉ. संजय उगेमुगे यांचा सन्मान करण्यात आला. यासह विशेष सन्मान म्हणून पत्रकार दीपक भातुसे, युवा उद्योजक गणेश राऊत, पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर, कोल्हापूर येथील यशवंत पाटील, सातारा जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सामाजिक कार्यकर्ते सरदार पांडुरंग बंगे, सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे, सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, प्राथमिक शिक्षक हणमंत काटकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील, उद्योजक लालासाहेब शिंदे, परतवाडी येथील नरसिंग दिसले, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उद्योजक मनीषा यांग याना विशेष सन्मानित करण्यात आले. 


यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, पत्रकारांबाबत कायदा अजून प्रलंबीत आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले याबाबत कडक कायदा होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. अधिस्विकृती बाबत आपण एकत्र येऊन यावर चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे आहे. पत्रकारांना कोणीच न्याय देत नाही. मालक पण देत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून काही करता येईल का यावर विचारविनिमय सुरु आहे. नियमितपणे सरकार आणि आपण तीन महिण्यांनी एकत्र बैठक घेणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे आपण संयुक्त एक बैठक घेऊ अशी घोषणा त्यांनी केली.


डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर येथे सुरु आहे. त्या अधिवेशनात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. एकत्र आल्याशिवाय एक दिशा ठरत नाही. दिशा मिळायची असेल तर बैठका आणि अधिवेशन होणे गरजचे असते. समाजाला दिशा आणि धडा सुद्धा तुम्ही शिकवू शकता. त्यामुळे बातमी दाखवताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एखादा भडक बोलला ते सुद्धा जसच्या तसे दाखवले जाते हे चुकीचे आहे. त्यामुळे शब्द जपून वापरणे आवश्यक आहे. एकवेळ राजकीय नेत्यांना प्रसिद्धी नाही दिली तरी चालेल. पण समाजात आज अनेक व्यक्ती आहेत जे काहीतरी नवीन करत आहेत. त्यांना प्रकाशझोतात आणणे गरजेचे असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आभार संजय कदम यांनी मानले. यावेळी  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण, शेखर जरेगावकर, रामकृष्ण बेताल, पुरूषोत्तम जाधव, डॉ. सुरेश भोसले, प्रतापसिंह पाटील, नितीन भिलारे, विकास भोसले, रूचेस जयवंशी, शिवाजी भिलारे आदींसह डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात 'डिजिटल मीडिया : नवे माध्यम' या विषयावर परिसंवाद आयोजित केला. या परिसंवादामध्ये जलतज्ञ अनिल पाटील, ॲडव्होकेट अतुल पाटील, प्राध्यापक विशाल गरड, माहिती जनसंपर्क पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर, यांचे मार्गदर्शन लाभले.