पिंगुळीत शाळकरी मुलाची आत्महत्या

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 17, 2025 21:28 PM
views 771  views

कुडाळ : पिंगुळी गोंधळयाळे येथील वेदांत रामदास करंगुटकर (वय16) या शाळकरी मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  सायंकाळी उशिरा साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घराच्या टेरेसवर जाऊन त्याने गळफास घेतला असल्याचे पोलिसांनी व प्रत्यक्षदर्शींनी  सांगितले. या घटनेनंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात  आणण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.