
सावंतवाडी : दसरा व दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल जाहीर केली आहे.
ही स्पेशल १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी धावेल. ०११७९/०११८० क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल १७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी धावेल. दर शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता एलटीटीहून सुटून त्याचदिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटीला पोहचेल.
असे असतील स्टाॅप
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ थांबे देण्यात आले आहेत.