
सावंतवाडी : महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कोकण विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत कोकण विभागातील महसूल, जमीन, नोंदणी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. बैठकीला शिक्षणमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांची विशेष उपस्थिती होती.
या बैठकीत कोकण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित महसूल प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जमीन, नोंदणी आणि इतर संबंधित बाबींवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर एकमत झाल्याचे समजते. यावेळी बैठकीला विधानपरिषद आणि विधानसभेचे आमदार, कोकण विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, जिल्हाधिकारी, आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागातील जनतेच्या हितासाठी महसूल विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिले.