
सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आयुष्मान कार्ड निर्माण या वर्गवारीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारणारे जी प मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साई धुरी ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा जिल्ह्यातील लाभार्थींचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करण्यातील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून (State Health Assurance Society) गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी एक मोठा सन्मान आहे. पुरस्कारासाठी जिल्ह्याच्या निवडीची प्रमुख कारणे:
आयुष्मान कार्ड निर्माण करण्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भरीव योगदान. जिल्ह्यातील ४९ गावांमधील लाभार्थींचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण. एकूण कार्ड निर्माणातील जिल्ह्याची कामगिरी सातत्यपूर्ण व प्रगतीशील आहे.