मुंबई : राज्यात जानेवारी ते मे २०२३ या पाच महिन्याच्या कालावधीत सात काेटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याती ही स्थिती आहे. विदेशी नागरिकांच्या मदतीने अंमली पदार्थांची विक्री हाेत असल्याने तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त हाेत असल्याचा मुद्दा मांडत आमदार राेहित पवार यांनी ‘उडता महाराष्ट्र’ हाेताेय का? असा प्रश्न सरकारली केला. त्यावर उत्तर देताना अंमली पदार्थ राेखण्यासाठी विविध उपाय केल्याचे सांगत या प्रकरणात गुंतल्याचे पाेलीस आढळून आले तर त्याला बडतर्फ केले जाईल अशी घाेषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधानसभेत लक्षवेधीद्वारे आमदार श्री. पवार यांनी अंमली पदार्थसंदर्भातील मुद्दयाकडे लक्ष वेधले. त्यावर श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. जानेवारी ते जून या कालावधीत ५० प्रकरणात ५७ आराेपींना पकडून ४४ लाखाचे गांजा, एमडी, आफीन, ब्राउन शुगर, गांजा आेढण्याचे साहित्य जप्त केल्याची माहिती देत अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी कंटेनर, कार्गाे येथे स्कॅनिंग सुरु केले आहे. कुरीयर, पाेस्टद्वारे ते पाेहाेच हाेवू नये म्हणून उपाय केले आहेत अशी माहिती दिली. यावर नाना पटाेले यांनी पाेलीस सक्षम आहेत मग अंमली पदार्थ येतातच कसे? असा प्रश्न केला. त्यावर फडणवीस म्हणाले, या प्रकरणात पाेलीस आढळून आले तर त्यांना बडतर्फ केले जाईल. या विषयावर आमदार, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रश्न उपस्थित केले.
या विषयावर बाेलताना राेहित पवार यांनी गृहखात्याच्या खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, राज्याचे अंदाजपत्रक १४ हजार काेटीचे तर सात हजार काेटीचे अंमली पदार्थ जप्त हाेतात. यातून युवा पिढी वाया जातेय. उडता पंजबा प्रमाणे ‘उडता महाराष्ट्र’ करायचे आहे का? असा सवाल सरकारला विचारला. पवार म्हणाले, शिक्षण, नाेकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण, तरुणी माेठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. पुणे शहरात विदेशी नागरिकांच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री हाेत आहे, पुणे शहरात तस्करी करणा-यांत नायजेरीयन गुन्हेगार आघाडीवर आहेत. गाेवा, मंुंबई येथून काेकेन, ब्राउन शुगरची तस्करी पुण्यात हाेते आहे. शहरातील काेरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजेवाडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हाॅटेलमध्ये त्याची ग्राहकांना विक्री करीत असल्याचे दिसते. अंमली पदार्थ विकण्यासाठी डंझाे अॅपचा वापर करत असल्याचा प्रकार समाेर आला आहे. अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी पेडलर आणी ग्राहक पाेलीस यंत्रणांच्या लक्षेत येत नाहीत, ते काेडवर्डमध्ये संवाद साधतात. व्हाटसअॅप इमाेझीचा वापर त करतात अशी माहिती सभागृहाला दिली.
नितेश राणे आक्रमक
या लक्षवेधीच्या चर्चेत आमदार नितेश राणेंनी सहभागी होत सभागृहाचं लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या तस्करी मध्ये बांगलादेशी नागरिकांच कनेक्शन आहे. त्यामुळे गृह विभागाने यांची गांभीर्याने दखल घ्यावी असे सांगितले. तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात गांभीर्याने लक्ष घालू असे सांगितले.