दीपोत्सवावर आज सूर्यग्रहणाची सावली | वाचा, काय शुभ, काय अशुभ..!

कोकणात कधी दिसेल सूर्यग्रहण ?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 25, 2022 11:46 AM
views 1096  views

ब्युरो न्यूज : Surya Grahan 2022 in india date : संपूर्ण भारतात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा दीपावळीला 27 वर्षांना शुभ योग आला आहे. त्यामुळे दीपोत्सव पर्व 5 नाही तर 6 दिवस साजरा करण्यात येणार आहे. दीपावली हा भारतीय संस्कृतीमधील प्रमुख सण आहे. प्रकाशाचा उत्सव म्हणजेच दीपोत्सवाच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. परंतु, यंदा लक्ष्मीपूजनानंतर सूर्यग्रहण लागणार आहे. विशेष म्हणजे या सूर्यग्रहणाचा देखील लक्ष्मीपूजनावर प्रभाव पडणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवारी 25 ऑक्टोबरला मध्यरात्री 2 वाजून 29 मिनिटांला 2022 वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे. यामुळे 12 तास आधीच सूतक काळ सुरू होणार आहे. लक्ष्मी पूजनानंतर लगेचच सूतक काळ सुरू होईल. सूर्यग्रहणामुळे 25 ऑक्टोबरला कोणतेही धार्मिक कार्य केले जाणार नाहीत. त्यामुळे बहीण-भावाच्या प्रवित्र नात्याचा उत्सव भाऊबीज 25 ऐवजी 26 ऑक्टोबरला साजरा करण्यात येईल. Also Read - Surya Grahan 2022 Time: भारतात किती वाजता दिसणार सूर्य ग्रहण? येथे पाहा वेळ आणि कालावधी

दीपोत्सवावर असेल ग्रहणाची सावली

दिवाळीत सूर्यग्रहण लागणार असल्याने 12 तासांचा सूतक काळ असणार आहे. त्यामुळे दीपोत्सवावर ग्रहणची सावली असणार आहे. सूतक काळात कोणत्याही प्रकारचा पूजा-विधी किंवा कोणतेही धार्मिक कार्य करण्यात येणार नाही. यंदा 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यात येईल. मात्र, दीपावली आणि गोवर्धन पूजेदरम्यान सूर्यग्रहण येत असल्यामुळे दिवाळी पर्वाचा एक दिवस वाढला आहे. सूर्यग्रहनामुळे यंदा दिवाळीचा उत्सव 6 दिवस साजरा करण्यात येणार आहे. 


कुठे दिसणार सूर्यग्रहण?

भारतासह खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यास्तापूर्वी हे सूर्यग्रहण भारतातील वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या वेळात दिसणार आहे.तसेच भारताप्रमाणेचं युरोप, मध्य पूर्व, आफ्रिकेचे उत्तर-पूर्व भाग, पश्चिम आशियातून सूर्यग्रहण दिसणार आहे.

सूर्यग्रहण भारतात दुपारी 04 वाजून 29 पासून संध्याकाळी 05 वाजून 42 मिनिटांपर्यंत दिसणार आहे. भारतात नवी दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, अहमदाबाद, सुरत,वाराणसी, मथुरा , कानपूर, पाटणा, उटी, चंदीगड यासह देशातील जवळपास सर्व भागांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे.दिल्ली आणि मुंबईमध्ये सूर्यग्रहण जवळपास दीड तास दिसणार आहे.


डोळ्यांवर होऊ शकतो गंभीर परिणाम…

सूर्यग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. उघड्या डोळ्यांनी सूर्हग्रहण बघितल्यास डोळ्यांवर गंभीर नुकसान होवू शकते,असा देखील इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

'ग्रहणातील कृत्ये : ग्रहणस्पर्श होताच स्नान कराने. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या 'मत्राचे 'पुनश्वरण करावे. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.


दरम्यान, कालनिर्णय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 

'ग्रहणाचे राशिपरत्वेफल : वृषभ, सिंह, धनु, मकर या राशींना शुभफल'

मेष, मिथुन, कन्या, कुंभ या राशींना मिश्रफल.

कर्क, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशींना अनिष्ट फल आहे,


ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.


मंत्र-तंत्र पुरश्वरणासंबंधी : नवीन मंत्र घेण्यास ब गृहीत मंत्राचे पुनश्वरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्वरण ग्रहण पर्वकालामध्ये केल्याने मंत्रसिद्धी होते.


शीतोदक पुण्यकारक, पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ ब पुण्यकारक आहे. सूयंग्रहणात नर्मदास्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदास्नान शक्‍य नसल्यास स्नानाचे वेळी नर्मदेचे स्मरण करावे.


'मोक्षस्नान आणि भोजनाविषयी :

या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नसला तरी काही शहरांच्या स्पर्श, मोक्ष वेळा दिल्या आहेत. तथापि भारतीय प्रमाणवेळेनुसार भारतातील सर्वात उशिराच्या मोक्षवेळेनंतर म्हणजे ०६.३२ नंतर मोक्षस्नान करावे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून नंतर भोजन करावे.