ओंकार हत्ती कुटुंबाच्या शोधात नसून मादीच्या शोधात

निसर्ग अभ्यासक शिवप्रसाद ठाकूर यांचं मत ; वनविभागासह जनतेलाही केलं आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: November 15, 2025 09:02 AM
views 193  views

सावंतवाडी : ओंकार हत्ती आपल्या फॅमिलीला शोधत फिरत नसून तो वयात आल्यामुळे समागमासाठी मादी शोधत आहे. याची जाणीव  भोळ्या–भाबड्या लोकांनी ठेवावी असं आवाहन निसर्ग अभ्यासक शिवप्रसाद गोपाळ ठाकूर यांनी केल आहे. पार्टनर मिळणं कठीण होऊन बसल्यास प्राणी अती आक्रमक होऊ लागतात. यातून जीवीत, वित्तीय हानी ह्या दोघांची शक्यता नाकारता येत नाही. वन्यजीवांबदल पुरेशी जनजागृती केली गेलेली नाही. त्यामुळे ह्या समाजात पसरलेले गैरसमज वन्यजीवांच्या आणि परिणामी माणसाच्या सुद्धा भविष्यासाठी हानिकारक ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

ओंकार हत्ती आता वयात आल्यामुळे समागमासाठी गाय, म्हैशींच्या दिशेने जायला लागला आहे. जे की गाय-म्हैशींच्या जीवीतास हानी पोहचवणारं आहे. ओंकारची आत्ताची स्टेज ही वयात येण्याची आहे. नर हत्ती 'मस्त' नावाच्या अवस्थेत असताना त्याच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हार्मोनची पातळी प्रचंड वाढते. ज्यामुळे तो अत्यंत आक्रमक आणि लैंगिकदृष्ट्या सक्रिय होतो. या अवस्थेत, जर त्याला लगेच मादी हत्ती उपलब्ध झाली नाही तर नर हत्ती वस्तू, वाहने, माड, मोठी झाडं किंवा इतर मोठ्या प्राण्यांवर माऊंट करण्याचा, अंगावर चढण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यावेळी त्याला आवरण कठीण होऊ शकत. त्यात गुरांचा मृत्यू, वस्तुंची नासधूस, जीवित आणि वित्तीय दोन्ही हानी व्हायला आता हळूहळू सुरूवात होणार आहे. हत्ती समागम करण्याच्या हेतूने नव्हे, तर केवळ आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या प्राण्यावर चढण्याचा प्रयत्न करू शकतो. थोडक्यात, नर हत्तीने म्हैशीवर चढण्याचा प्रयत्न करणे हे चुकीच्या दिशेने झालेले किंवा अति-आक्रमक वर्तन असू शकते. ते दुर्मीळ असले तरीही ते शक्य आहे. परंतु, यातून प्रजनन होणे किंवा यशस्वी समागम होणे जैविकदृष्ट्या अशक्य आहे. या सगळ्याच्या परिणामाने ईतर पाळीव प्राण्यांच्या जिवितास हानी पोहचणार आहे.

वन्यजीव जेव्हा आपला नैसर्गिक अधिवास सोडून अन्नाच्या, भक्षाच्या शोधात मनुष्य अधिवासात शिरतात तेव्हा तो झोन म्हणजे " ना मादी अधिवास" आणि अशा ठिकाणी त्या प्राण्यांना बाकी सगळ्या गोष्टी मिळू शकतील.पण, समागमासाठी आवश्यक पार्टनर मिळणं कठीण होऊन बसतं. अशावेळी ते प्राणी अती आक्रमक होऊ लागतात. नंतर मग जिवीत आणि वित्तीय हानी ह्या दोघांची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत वन्यजीवांबदल पुरेशी जनजागृती केली गेलेली नाही. त्यामुळे ह्या समाजात पसरलेले गैरसमज वन्यजीवांच्या आणि परिणामी माणसाच्या सुद्धा भविष्यासाठी हानिकारक ठरणारे आहेत. आत्ताच ही वेळ आहे माणसाने माणुसकी जपून ज्ञान आत्मसात करण्याची आहे. नाहीतर विनाशाकडे होणारी ही वाटचाल खरंच विनाश ओढवून घेणारी ठरेल असं मत निसर्ग अभ्यासक शिवप्रसाद ठाकूर यांनी व्यक्त केल आहे. तसेच ओंकार किंवा त्याच्यासारख्याच इतर हत्ती किंवा अन्य प्राण्यांच्या स्थलांतर आणि भविष्यातील गैरसोयीबद्दल एक महत्वाची आणि सेन्सिटिव्ह गोष्ट म्हणजे त्यांचा लुप्त होणारा नैसर्गिक अधिवास आहे. हळूहळू इतर अनेक वन्यजीव मनुष्वस्तीत येणार आहेत. त्यावेळी आपण त्या सगळ्यांना "वनतारा" सारख्या ठिकाणी पाठवणार आहोत का ? म्हणजे पुढच्या पिढींसाठी सुद्धा आपण फक्तं "प्राणीमित्र आंदोलन" एवढं भविष्य ठेवणार आहोत का ? यावरती ठोस पर्याय आणि त्यातले दोष आणि संभावना यावर लवकरच मुद्द्यांसकट बोलेन असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.