अंधारलेल्या कोकणाला उजेड दाखवला 'निलेश पर्वा'ने

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 15, 2025 11:39 AM
views 154  views

कोकणात विजेचा प्रश्न किती गंभीर आहे, हे अनुभवायचे असेल तर कोकणात राहावे लागते. वर्षानुवर्षे असणारी ही वीजेची समस्या फक्त आणि फक्त बातम्यांमध्येच झळकत होती. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ती सर्वप्रथम विधानसभेच्या अधिवेशनात आली आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक वर्षे रखडलेल्या या विकासकामाला मुर्त स्वरूप आले. किती आले आणि किती गेले परंतु आता अंधारलेल्या कोकणला नवा प्रकाश दाखवणारे आमदार म्हणून निलेश राणे यांचेच नाव इतिहासाच्या पानावर कोरले गेले.

आमदार निलेश राणे यांनी तळकोकणातील विज पुरवठयाबाबत भयावह परिस्थिती विधानसभा सभागृहासमोर आणल्यानंतर आता विजेच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यासाठी ४१ ट्रान्सफार्मर मंजूर झालेत. सबस्टेशनसाठीचे सर्व्हे सुरू असून भूमीगत वीज वहिनीची ५४० कोटींची विकासकामे सुरू आहेत. अनेक वर्षांची विज वितरणची सडलेली यंत्रणा बदलण्याच्या कामाला वेग आला असून पावसाळ्यातील समस्या दूर होणार आहे.

आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात कोकणातील गंभीर वीज समस्यांवर लक्ष केंद्रित केले होते. अभ्यासपूर्ण माहिती देत सरकारचे लक्ष वेधलं होते‌. यात त्यांनी विज वितरणची सडलेली यंत्रणा, पावसात सतत खंडित होणारा विजपुरवठा, जंगलातून गेलेली विज वाहिनी, वीज वितरण कर्मचाऱ्यांची कमतरता, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सुरक्षा साधनांअभावी झालेले मृत्यू, अधिकारी वर्गाची कमतरता, मेंटेनन्ससाठी मिळणारे तुटपुंजे पैसे आणि एकंदर कोकणाकडे झालेले दुर्लक्ष हे मुद्दे प्रकर्षाने मांडले होते. कोकणातील वीज यंत्रणा सुधारण्याची त्यांनी जोरदार मागणी केली होती. त्यासाठी किरकोळ पैसे नको तर एकदाच पॅकेज द्या आणि जुनाट झालेली यंत्रणा नवीन करण्याची मागणी केली होती. यावर उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या समस्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे मान्य केले होते.  ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार 15 जुलै 2025 रोजी मुंबईत ही बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्या सोडवण्यासाठी आराखडा बनवण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार नवीन विद्युत सबस्टेशन, नवीन ट्रान्सफार्मर, नवीन विद्युत वाहिनी आणि भूमीगत वीजवाहिनी या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली होती. आमदार निलेश राणे यांनी या बैठकीत सिंधुदुर्गच्या मागण्या रेटून धरल्या.   

सबस्टेशनसाठी सर्व्हे, ४१ ट्रान्सफार्मर मंजूर !

या बैठकीनंतर पुढील कार्यवाही देखील सुरू झाली आहे. कुडाळ - मालवण तालुक्यातील पणदूर, माणगाव, निळेली, रामगड, कुंभारमाठ या ठिकाणी सबस्टेशनसाठीचे सर्व्हे सुरू आहेत. श्री. राणे यांनी जिल्हा वार्षिक योजना आणि सिंधुरत्न समृद्ध योजना यांच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ४१ ट्रान्सफार्मर मंजूर केले आहेत. यामुळे अनेक भागांतील कमी दाबाच्या आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या कमी होण्यास मदत होत आहे.

मंजूर झालेल्या काही प्रमुख ट्रान्सफार्मरच्या ठिकाणात आचरा समर्थ नगर, तारकर्ली नवीन दत्त मंदिर नजीक, वायरी भूतनाथ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नजीक आणि वायरी आचरेकर कंपाउंड येथे तसेच कुंभारमाठ गोवेकर दुकान नजीक आणि गवळीवाडी नजीक, घुमडे घुमडाई मंदिर येथे आणि खैदा घुमडे, माऊली मंदिर चिंदर, नेरुर कुलस्वामिनी मंदिर, पावशी सिमावाडी कुंभार वाडी, माड्याचीवाडी (मडगाव) पोलीस चेक पोस्ट नजीक, वेताळ बांबार्डे पावणाईटेंब सावंत पार्क आणि कदम वाडी, जांभवडे कुंभारवाडी व भंडारवाडी आणि जांभवडे कुंभारवाडी, झाराप मुंडयेवादी,

देवबाग मोबारवाडी ट्रान्सफार्मर

मालवण फोवकांडा मालवण, मालवण बोर्डिंग ग्राउंड, मालवण धुरीवाडा, सर्जेकोट, कांदळगाव परबवाडा,  रांगणातुळसुली कदमवाडी, बाव आंबेडकरनगर आदींचा समावेश आहे. तसेच डिकवल वरचीवाडी, कुणकवळे बागवाडी, गोळवण सावरवाड, आचरा हिर्लेवाडी, तळगाव शेळवणेवाडी, काळसे परबवाडी, कट्टा बाजारपेठ, कुडाळ मच्छीमार्केट, पिंगुळी गुढीपुर, चेंदवन वेलवाडी, वालावल आर्कचापूल, शासकीय तंत्रनिकेतन, देवली वाघवणे, मांडकुली भोईवाडी, निवजे गावात, कसाल बाजारपेठ, आंबेरी गोसावीवाडीचाही समावेश आहे. 

भूमिगत वीज वहिनीचे मोठे आणि कोकणातील किनारपट्टीच्या भागातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी भूमीअंतर्गत वीज वहिनी करण्यावर जोर दिला आहे. ५४० कोटींची ही विकासकामे कोकण आपत्ती सौमिकरण अंतर्गत सुरू आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होतील, ज्यामुळे वादळ, पाऊस या सारख्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. एकंदरीत, आमदार निलेश राणे यांनी वीज समस्येवर केवळ अधिवेशनात आवाज उठवत शांत न बसता प्रशासकीय बैठकांतून सतत पाठपुरावा केला. यासाठी निधीची उपलब्धता आणि प्रत्यक्ष कामे मंजूर करून घेत ठोस स्वरूपात उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या तत्परतेसाठी सामान्य जनतेतून ऋण व्यक्त केले जात आहे. एकुणच जनतेला भेडसावणाऱ्या वीज समस्या कायमस्वरूपी दूर होण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.

पहिल्यांदाच झालं कामांचं वर्गीकरण : आम. निलेश राणे

महावितरण खात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह कोकणातील आमदारांची बैठक झाली. यात आम.योगेश कदम, आम.दीपक केसरकर यांच्यासह कोकणातील आमदार होते. यात समस्यांबाबत आम्ही लक्ष वेधल. त्यात दुरुस्ती काम कुठे करायची ? नवीन काम, सबस्टेशनची काम आणि भूमिगतची काम कुठे करायची? याच वर्गीकरण झालं. आजपर्यंत ते वर्गीकरणच झालं नव्हतं. कुडाळ-मालवणच प्रेझेंटेशन मी केलं. मागच्या दोन महिन्यांत हे वर्गीकरण झालं असून खात्याचे सचिव आमच्या संपर्कात आहेत‌. सबस्टेशन, अंडरग्राऊंडची काम मंजूर झालीत. दुरुस्तीसाठी पैसे मतदारसंघात आलेत. समस्यांचे वर्गीकरण करून कामाला प्रारंभ झाला आहे, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.

कृष्णा ढोलम, चीफ रिपोर्टर, कोकणसाद LIVE