कणकवली : आफ्रिकन बोअर (African boer) या जातीची शेळी दक्षिण आफ्रिकेत १९०० व्या शतकात खास मांस उत्पादनासाठी विकसित केली गेली. या जातीच्या शेळ्या विशेषकरून मांस (chevon) उत्पादनासाठी वापरल्या जातात. या जातीचे मातृत्व कौशल्य इतर शेळ्यांच्या तुलनेत अधिक असते. ही शेळी उष्ण कटीबंधीय प्रदेशापासून थंड प्रदेशातील हवामानाशी जुळवून घेण्यास सक्षम आहे. म्हणूनच नादगोट फार्म भिरवंडे तालुका कणकवलीच्या वतीने होतकरू तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी या जातीच्या शेळ्या पालन करण्याचे आवाहन नादगोट फार्मसी व्यवस्थापक निलेश सावंत यांनी केले आहे.
बोअर शेळी संगोपनाकडे वाढता कल
बोअर शेळीची वैशिष्ट्ये - या जातीच्या शेळ्यांचे शरीर पांढरे मात्र डोके लाल असते. - शेळ्यांचे कान लांब असून ते लटकल्यासारखे भासतात. - या शेळ्यांची शिंगे जाड असून मागे वक्र होत गेलेली असतात. -डोळ्यांचा रंग तपकिरी असतो. - पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे वजन 80 ते 90 किलोपेक्षा अधिक असते, नराचे वजन 90 ते 100 किलोहून अधिक असते. - या जातीच्या शेळ्यांच्या वजन वाढीचा दर 200 ते 250 ग्रॅॅम प्रती दिवस असतो. - नरांचा उपयोग प्रजननासाठी किंवा मांसासाठी तर मादीचा उपयोग प्रजजनासाठी केला जातो. - यांचा फक्त वाढीचा दर जास्त नाही तर त्यांच्या प्रजननाचा दर देखील जास्त आहे. - बोअर यांचे सरासरी आयुष्य 12 ते 15 वर्षे असते. नवीन शेळीपालनाचा व्यवसाय करू इच्छिणारे तरुण उद्योजक बोअर शेळीकडे जास्त प्रमाणात वळताना दिसू लागलेत. त्यामुळे कोकणातील तरुणांनी हा व्यवसाय केल्यास नक्कीच आपली उन्नती होऊ शकते, असे नादगोट फार्मचे व्यवस्थापक निलेश सावंत यांचे म्हणणे आहे