रिझल्ट लागून एक आठवडा झाला तरी आर्या रोज दिवसभर काँप्युटरसमोर बसलेली असायची. बारावीला छान मार्क्स मिळाले होते, नातेवाईक घरी भेटायला येत होते, कोणी ना कोणी अभिनंदनाचे कॉल्स करत होतं, पण आर्याचं कशातच लक्ष नव्हतं. बाकीचं राहू दे, पण तिच्या रिझल्टनंतर आई बाबा तिला बाहेर जेवायला घेऊन गेले, तेव्हाही ती अर्धा वेळ फोनमध्येच डोकं घालून बसली होती. शेवटी आईनं तिचा फोन काढून घेतला, तेव्हा कशीबशी ती जेवली. रोज आईवडिलांचं टेन्शन वाढत होतं. पेपरमध्ये कॉलेजेसचे कट ऑफ येत होते, ऍडमिशन्ससाठी लाईन्स लागत होत्या आणि त्यांची मुलगी मात्र दिवसभर काँप्युटरसमोर वेळ काढत होती.
हिला काही सिरीयसनेस आहे की नाही, हिच्याशी एकदा बोललंच पाहिजे, असं ठरवून एक दिवस वडील तिच्या खोलीत गेले आणि सहज म्हणून त्यांनी स्क्रीनवर नजर टाकली तर ते हादरलेच.... कॅनडामधल्या कुठल्यातरी कॉलेजची वेबसाईट ओपन करून आर्या त्याचे डिटेल्स नोट डाऊन करून घेत होती. वडिलांना काही कळेना..... त्यानंतर एकदा त्यांनी तिला शांतपणे समोर बसवून घेतलं आणि विचारलं, तुला पुढं काय करायचंय?? ती शांतपणे म्हणाली, मी एमबीएचा विचार करतीय, पण मला भारतात माझ्या प्रेफेरन्सचं कॉलेज मिळत नाहीये, म्हणून मला परदेशात जायचंय..... वडिलांनी विचारलं, तुझा प्रेफेरन्स काय आहेत, ते मात्र तिला नीटसं सांगता येईना.
दुसऱ्या दिवशी वडील तिला घेऊन ऍडमिशन प्लेक्सच्या ऑफिसमध्ये आले. तिला खरं तर या गोष्टीची गरज वाटत नव्हती, पण वडिलांच्या हट्टापुढे तिचं काही चाललं नाही. ऍडमिशन प्लेक्समधील तज्ञ काऊन्सेलरनं तिला नेमकं काय हवंय, हे जाणून घेऊन तिला भारतातलेच बेस्ट कॉलेजेसचे अनेक पर्याय सांगितले. एवढंच नाही, तर ते पर्याय तिच्यासाठी कसे योग्य आहेत, हेही तिला व्यवस्थित पटवून दिलं आणि पुढच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तिला मोलाची मदत केली.
आज बंगलोरच्या एका उत्तम कॉलेजमधून एमबीए पूर्ण करून आर्या तिच्या कंपनीच्या कामासाठी दर तीन एक महिन्यांनी कॅनडाला जाते. तिच्या यशस्वी करिअरमध्ये ऍडमिशन प्लेक्सचं मोठं योगदान आहे, असं तिला मनापासून वाटतं. ऍडमिशन प्लेक्सनं तिच्या स्वप्नांचं मूल्य ओळखलं आणि त्यांना व्यवस्थित आकार द्यायला तिला मदत केली, कारण स्वप्नांना ऑप्शन्स नसतात....
आजच भेट द्या आणि रजिस्ट्रेशन करा
www.admissionplex.com