LIVE UPDATES

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची वेंगुर्ला पंचायत समितीला भेट

सभापती, उपसभापतींनी केला सन्मान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 15:23 PM
views 35  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालय येथे भेट दिली. यावेळी सभापती दालनात त्यांचा वेंगुर्ला पंचायत समितीच्यावतीने सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांच्यामार्फत शाल श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तुळसचे रामचंद्र परब, वाफोली उसरपंच विनेश गवस, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, मातोंड ग्रा. पं. सदस्य व पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपेश परब, पत्रकार अजय गडेकर, आडेलीचे विष्णू कोंडसकर आदी उपस्थित होते.