LIVE UPDATES

शिरोडा येथे संजू परबांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 16:26 PM
views 42  views

वेंगुर्ला : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने शिरोड्यात विविध सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. रुग्णसेवा, शैक्षणिक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब, उपजिल्हाप्रमुख तथा पं स माजी सभापती सुनिल मोरजकर, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, महिला तालुकाप्रमुख शीतल साळगावकर, विभाग प्रमुख अमित गावडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक, प्रथमेश बांदेकर, अनिष्का गोडकर, माजी उपसरपंच रवी पेडणेकर, आरवली माजी उपसरपंच मयूर आरोलकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, उत्तम चव्हाण, बाळा कुडव, आनंद गोडकर, प्राची नाईक, हर्षा परब, रश्मी पेडणेकर, दिलीप मठकर, समीर दाभोलकर, जयदेव गावडे व शिवसैनिक उपस्थित होते. 

शिवसेनेच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या मूळ विचारधारेनुसार वाढदिवसाच्या निमित्ताने शिरोडा उपजिल्हा रुग्णालयायील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच येथील प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सीलिंग फॅन भेट देण्यात आले व विविध शाळांमध्ये वृक्षवाटप, वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य असेच सातत्याने घडत राहावे, अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आली.