
सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार १९ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे भव्य वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि शिवसेना पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडीच्यावतीने सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा कृष्ण हनुमान युद्ध हा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व नाट्यप्रेमी मंडळींनी 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता गोविंद चित्र मंदिर याठिकाणी उपथित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल राऊळ आणि विद्यमान अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांनी केले आहे.










