
देवगड : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हुर्शी येथे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या माध्यमातून झाला. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंदार तिर्लोटकर दीक्षित फाउंडेशनचे सदस्य सुरेश देवळेकर व अंगणवाडी सेविका श्रीमती शालिनी तारकर मॅडम मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सूर्यवंशी शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्पर्धा मधील सहभागामुळे आत्मविश्वास व्यक्तिमत्व विकास व सर्जनशीलतेला चालना मिळते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पाटील मॅडम यांनी केले व प्रास्ताविका मुख्याध्यापिकासह सूर्यवंशी मॅडमनी केले व आभार कोकरे सरांनी मानले.












