
कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विकास बडवे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आज बुधवारी अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कुडाळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते आणि तेव्हापासून कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे होता. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या अंतर्गत प्रशासकीय बदल्यांनुसार पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची कुडाळ पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. याच बदलांतर्गत कुडाळ उपविभागीय पोलीस अधिकारीपदी राजेश भागवत यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विकास बडवे आणि राजेश भागवत यांची भेट घेऊन परिसरातील विविध मान्यवरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











