LIVE UPDATES

देवगड तालुका 'केमिस्ट' अध्यक्षपदी मिलिंद मोर्ये यांची निवड

नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड : तालुका सचिवपदी अभय कुळकर्णी, जिल्हा सदस्यपदी प्रवीण जोग, योगेश गुरव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 19:46 PM
views 20  views

देवगड : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या देवगड तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मिलिंद मोर्ये यांची, तर सचिवपदी अभय कुळकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील राधाकृष्ण रिट्रीट येथे असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन तालुका कार्यकारिणीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ औषध व्यावसायिक किशोर कुळकर्णी हे उपस्थित होते. निरीक्षक तथा जिल्हा संघटनेचे सचिव संजय सावंत (वैभववाडी) यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२६ ते २०२९ पर्यंतच्या कालावधीसाठी तालुका नूतन कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य निवड करण्यात आली. नूतन तालुका कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मिलिंद मोर्ये, उपाध्यक्षपदी देवेंद्र जेठे, सचिवपदी अभय कुळकर्णी, खजिनदारपदी राहुल शिरसाट, सहसचिवपदी विजय पडवळ, संघटन सचिवपदी सनीत आचरेकर यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी प्रवीण जोग व योगेश गुरव यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद मोर्ये यांनी संघटनेच्या सदस्यांचे आभार मानत औषध व्यावसायिकांच्या समस्या सोडविणे, औषध वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे, नव्या पिढीतील फार्मासिस्ट व केमिस्ट यांना संघटनेशी जोडणे आणि संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. सभेनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा किशोर कुळकर्णी व संजय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेला तालुक्यातील २५ सदस्य उपस्थित होते. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी तालुका कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.