LIVE UPDATES

विद्यार्थ्यांना चांगल्या हुद्यावर झळकविण्यासाठी आमचे प्रयत्न : विशाल परब

वेंगुर्लेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 14, 2026 21:58 PM
views 90  views

वेंगुर्ला : जिल्ह्रातील मुलांना राज्यासहीत देशपातळीवर झळकताना पहाण्याची आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची इच्छा आहे. येणा-या काळात विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी विधानसभा मतदार संघात विविध कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करणार असून देशात चांगल्या हुद्यावर विद्यार्थी चमकण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. वेंगुल्र्यात ज्ञानाची खाण आहे. अशाप्रकारचे गुणगौरव कार्यक्रम ही फक्त सुरूवात आहे. ज्या ठिकाणी गरज भासेल, त्याठिकाणी आम्ही विद्याथ्र्यांच्या सोबत आहोत, असा वि·ाास भाजपाचे युवानेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे बोलताना व्यक्त केला.

कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळस आणि विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्याथ्र्यांच्या गौरव सोहळ्यात श्री.परब बोलत होते. यावेळी सर्वप्रथम परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपिठावर बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, कोकण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगरसेवक रवी शिरसाट, सचिन शेटये, गौरी माईणकर, रिया केरकर, युवराज जाधव, समिर कुडाळकर, वेताळ प्रतिष्ठानचे विवेक तिरोडकर, महेश राऊळ यांच्यासहीत तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

या कार्यक्रमात गुणवंत विद्याथ्र्यांचा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना विशाल परब म्हणाले, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून विद्याथ्र्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.सचिन परूळकर यांनी मानले.