LIVE UPDATES

सोनाळीत पायवाटेच्या वादातून दोन गटांत हाणामारी

परस्परविरोधी तक्रारी, आठ जणांवर गुन्हे
Edited by:
Published on: July 14, 2026 21:27 PM
views 33  views

वैभववाडी : तालुक्यातील सोनाळी तळेकरवाडी येथे पायवाटेच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीयांमध्ये घरासमोरील वडिलोपार्जित जमिनीतील पायवाटेच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.

याप्रकरणी सपना संजय शिंदे (वय २१, रा. सोनाळी तळेकरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वैभव मुरारी शिंदे, निलेश मुरारी शिंदे, मुरारी आकाराम शिंदे आणि दीप्ती आकाराम शिंदे यांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरीकडे वैभव मुरारी शिंदे यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सपना संजय शिंदे, स्वाती संजय शिंदे, गौरव संजय शिंदे आणि संजय सहदेव शिंदे यांनी शिवीगाळ करून कोयत्याच्या मुठीने व हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरूनही संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.