LIVE UPDATES

कॉपी प्रकरणातील संजय राठोडचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

वैभववाडी परीक्षा गैरप्रकार प्रकरण | जिल्हा न्यायालयाचा निर्णय
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 14, 2026 21:39 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : वैभववाडी येथील दहावीच्या परीक्षा गैरप्रकार प्रकरणातील संशयित आरोपी संजय कणीराम राठोड यांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी फेटाळून लावला.

भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रातील कॉपी प्रकरणात वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी संशयित आरोपी संजय कणीराम राठोड यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी हा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी बाजू मांडली.