
वेंगुर्ले : जेएसडब्ल्यू मायनिंग सर्व्हेक्षण विरोधात आजगावात तणाव निर्माण झालेला पाहायला मिळाला. मायनिंग सर्व्हेक्षण केल्याचा आरोप करत सर्व्हेक्षण करणाऱ्या "जेएसडब्ल्यू" कंपनीच्या माणसांना ग्रामस्थांकडून चोप देण्यात आल्याची माहिती मिळतेय. या कर्मचाऱ्यांना चोप देत वेतोबा मंदिरात आणलं गेलं. यावेळी मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ वेतोबा मंदिरात जमा झाले होते. दरम्यान, वेंगुर्ला पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून, ग्रामस्थही आक्रमक झालेले पहायला मिळाले.











