
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली पंचायत समिती येथे गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. ग्रामीण भागातील उत्पादक,महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पं. स. सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, बी.डी.ओ अरुण चव्हाण, सर्व पं. स. सदस्य, जि. प. सदस्य तसेच बाजार परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, महिला बचत गटांच्या सदस्य, शेतकरी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध स्टॉल्सना भेट देत ग्रामीण भागातील महिलांनी आणि स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली. गावागावांतून आणलेल्या घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पापड, सेंद्रिय उत्पादने, काजू प्रक्रिया उत्पादने, हस्तकला साहित्य तसेच पारंपरिक ग्रामीण उत्पादनांचे त्यांनी कौतुक केले.










