
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर रविवार मध्यरात्रीपासून मान्सून टाईम टेबल लागू होत आहे. यामुळे उद्या सोमवारपासून मार्गावर धावणाऱ्या ट्रेन त्यांच्या नियमित वेळेपेक्षा काही रेल्वे गाड्या आधी तर काही उशिरा मान्सून वेळापत्रकाप्रमाणे धावतील. यामुळे प्रवाशांनी या बदललेल्या वेळा लक्षात घेऊन स्थानकावर पोहचावे असे आवाहन कोकण रेल्वे कडून करण्यात आले आहे.










