
वैभववाडी : उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपंचायत वाभवे-वैभववाडीच्या हद्दीतील कोंडवाडी येथे सुख नदीवर बंधारा घालण्यात आला.नगरपंचायतीचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून हा बंधारा बांधला.पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
नदीतील पाणी अडविल्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांना तसेच शेतीला याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, नगरसेवक संजय सावंत, भाजप शहराध्यक्ष शिवाजी राणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. जलसंधारणाच्या अशा उपक्रमांमुळे पाण्याचे संवर्धन होऊन भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








